Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

जगभरात ५० लाख नागरिक करोनाग्रस्त; तीन लाख २८ हजारांहून अधिक मृत्यू

Share

मुंबई : करोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा जगभरातील आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा आकडा आता तब्बल ५० लाख रुग्णांवर जाऊन पोहोचला आहे. तर करोना व्हायरस संक्रमनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या ३ लाख २८ हजार पेक्षाही अधिक झाली आहे.

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळपर्यंत जगभरात एकूण ४९ लाख ९५ हजार ७१२ नागरिकांना कोरना व्हायरस संक्रमन झाले आहे. तर, ३ लाख २८ हजार ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ संचलीत सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग ही आकडेवारी जाहीर करत असते.

जगभरातील देशांचा विचार करता कोरोना व्हायरस संक्रमनामुळे अमेरिकेत सर्वाधिक कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आहेत. सर्वाधिक मृत्यूही अमेरिकेतच झाले आहेत. एकट्या अमेरिकेत ९३ हजार ४३१ नागरिकांचे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाले आहेत. तर १५ लाख ५१ हजार ८६८ नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची नोंद आहे.

अमेरिकेनंतर करोना व्हायरस संक्रमित रुग्णांची सर्वाधिक संख्या ही रशियात आहेत. रशियामध्ये कोरोना व्हायरस संक्रमित ३ लाख ८ हजार ७०५ रुग्ण आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!