Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सप्तशृंगी गडाच्या धर्तीवर अंजनेरी गडावर वळण रस्ता होणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

सप्तशृंगी गडाच्या धर्तीवर अंजनेरी गडावर थेट वरपर्यंत रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव खा. हेमंत गोडसे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. मुळेगाव ते अंजनेरी असा 14 किलोमीटरचा हा वळण रस्ता असणार आहे. या ठिकाणी रस्ता झाल्यास पर्यटनाच्या संधी निर्माण होतील.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर हे देशभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशभरातून रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच अंजनेरी गड आहे. जिल्ह्यातील पर्यटक व ट्रेकर यांचे हे लोकप्रिय ठिकाण आहे.

मात्र जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना अंजनेरी गडाबाबत फारशी माहिती नाही. या ठिकाणी पोहोचण्यास थेट मार्ग नसल्याने पर्यटक या ठिकाणी जात नाहीत. मात्र हे स्थळ उत्तम पद्धतीने विकसित केले तर पर्यटकांचे हे आवडते स्थळ होऊ शकते.

ही शक्यता लक्षात घेता खा. गोडसे यांनी मुळेगाव ते अंजनेरी हा 14 किलोमीटरच्या रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला आहे. सप्तशृंगी गडाच्या धर्तीवर हा मार्ग असेल. थेट अंजनेरी गडाच्या माथ्यापर्यंत रस्ता तयार झाल्यास या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढेल. त्या माध्यमातून पर्यटन व रोजगारास चालना मिळेल. खा. गोडसे यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघात हे क्षेत्र येते. खासदार निधीतून त्यांनी हा रस्ता विकसित करण्याची तयारी दर्शवली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!