Wednesday, April 24, 2024
Homeनगरमुळा नदी पात्रात तिघांना जलसमाधी

मुळा नदी पात्रात तिघांना जलसमाधी

आदर्श शिक्षकासह दोन अभियंत्यांचा समावेश

अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यातील चास येथील मुळा नदीवर असणार्‍या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावर पोहण्यासाठी गेलेल्या मामा व दोन भाचे यांना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जलसमाधी मिळाली.त्यात तानाजी वाडेकर या शिक्षकांचा समावेश आहेत.

रविवारी पोहण्यासाठी गेलेल्या सुनील तुकाराम वाडेकर वय 40 व्यवसाय शिक्षक व त्यांचे भाचे प्रवीण दत्तात्रय फापाळे वय 32 ,व सचिन दत्तात्रय फापाळे वय 36 दोघेही अभियंता असून त्यांना रविवारी सायंकाळी पाच वाजता मुळा नदी पात्रात जलसमाधी मिळाली , त्यातच तिघांचे निधन झाले. सुनील वाडेकर हे शिक्षक होते. दुर्गम डोंगराळ भागातली शिरसगाव धुपे (तालुका संगमनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपाध्यापक म्हणून कार्यरत होते.
त्यांनी शाळा नावारुपाला आणली होती. त्यांची सोनूमोनू बचत बँक कौतुकाची विषय ठरली होती. आदिवासी विभागातील शाळांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम केल्याबद्दल त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. आज दुपारी मुळा नदीत पोहोयला गेलेल्या भाच्याला वाचवायला गेलेल्या सुनील वाडेकर यांचा आणि दोघा भाच्यांचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची अत्यंत धक्कादायक बातमीने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहेत.
- Advertisment -

ताज्या बातम्या