Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘मुळा’च्या निवडणुकीसाठी तिसर्‍या दिवसअखेर 52 अर्ज दाखल

Share
‘मुळा’च्या निवडणुकीसाठी तिसर्‍या दिवसअखेर 52 अर्ज दाखल, Latest News Mula Election Form Newasa

तिसर्‍या दिवशी 42 अर्ज दाखल; आतापर्यंत सोनई व घोडेगाव गटातून प्रत्येकी 5 खरवंडीतून 6, करजगावमधून 7 नेवाशातून 8, प्रवरासंगममधून 4, सहकारी संस्था व अनुसूचित जाती जमातीतून प्रत्येकी एक, महिला राखीवमधून 3, इतर मागासवर्गीय 6 तर भटक्या विमुक्तमधून 6 अर्ज दाखल

नेवासा (तालुका वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या 16 एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या तिसर्‍या दिवशी एकूण 42 अर्ज दाखल झाल्याने तिसर्‍या दिवसअखेर अर्ज दाखल झालेल्या इच्छुकांची संख्या 52 झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवस आहेत.

काल तिसर्‍या दिवसअखेर सोनई गटातून 5, घोडेगाव गटातून 5, खरवंडी गटातून 6, करजगाव गटातून 7, नेवासा गटातून 8, प्रवरासंगम गटातून 4, सहकारी संस्था राखीवमधून 1, अनुसूचित जाती जमाती राखीव साठी 1, महिला प्रतिनिधी राखीवसाठी 3, इतर मागास साठी 6 तर भटक्या विमुक्त जाती विशेष प्रवर्गासाठी 6 असे एकूण 52 अर्ज दाखल झाले आहेत.

सोनई गट
उत्पादक सभासद सर्वसाधारण मतदार संघाच्या सोनई गटातून गजानन पुंजाजी दरंदले (सोनई) यांचा अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जाला कचरु वासुदेव जामदार सुचक तर मुलीधर माधव राशीनकर अनुमोदक आहेत. भाऊसाहेब गोरक्षनाथ येळवंडे (रा. कांगोणी रोड सोनई) यांना प्रताप भाऊसाहेब येळवंडे सुचक तर जगन्नाथ गोरक्षनाथ येळवंडे अनुमोदक आहेत. कारभारी काशिनाथ डफाळ (रा. सोनई) यांच्या अर्जाला शंकर महादू टिक्कल सुचक तर ज्ञानेश्‍वर शंकर गवळी अनुमोदक आहेत. राजपालसिंह भगीरथसिंह जनवीर (रा. सोनई) यांच्या अर्जाला जीवनसिंग महितापसिंग परदेशी सुचक तर विशाल बाप्पाजी आंधळे अनुमोदक आहेत.

घोडेगाव गट
घोडेगाव गटातून काल तीन अर्ज दाखल झाले. राम नामदेव सोनवणे (रा. घोडेगाव) यांच्या अर्जाला ज्ञानेश्‍वर दत्तात्रय सोनवणे सूचक तर तुकाराम धोंडीराम सोनवणे अनुमोदक आहेत. वसंत नारायण सोनवणे (रा. घोडेगाव) यांच्या अर्जाला कचरु सखाराम सोनवणे सुचक तर अर्जुन भोजराज सोनवणे अनुमोदक आहेत. रामदास लक्ष्मण घुले (रा. माका) यांच्या अर्जाला सुभाष दशरथ घुले सुचक तर सुदाम नामदेव घुले अनुमोदक आहेत.

खरवंडी गट
खरवंडी गटातून काल तिसर्‍या दिवशी तीन अर्ज दाखल झाले. एकनाथ विठ्ठल रौंदळ (रा. कांगोणी) यांच्या अर्जाला ज्ञानदेव रंगनाथ सोनवणे सुचक तर हेमलता ज्ञानदेव सोनवणे अनुमोदक आहेत. भाऊसाहेब दगडू चव्हाण (रा. म्हाळसपिंपळगाव) यांच्या अर्जाला नानासाहेब तुकाराम आहेर हे सुचक तर प्रकाश वासुदेव आहेर हे अनुमोदक आहेत. सोमनाथ बाबासाहेब कराळे (रा. कांगोणी) यांच्या अर्जाला दत्तात्रय सावळेराम कर्डिले हे सुचक तर कैलास बाबासाहेब कराळे हे अनुमोदक आहेत.

करजगाव गट
करजगाव गटातून काल 7 अर्ज दाखल झाले. चांगदेव आनंदा दहीफळे (रा. गणेशवाडी) यांच्या अर्जाला महादेव हरी गडाख हे सूचक तर नारायण बंकट दहीफळे हे अनुमोदक आहेत. विनायक किसन पुंड (रा. करजगाव) यांच्या अर्जाला नंदू दादा देवखिळे हे सूचक तर गणेश भास्कर पुंड हे अनुमोदक आहेत. विनायक हरिभाऊ माकोणे (रा. वाटापूर) यांच्या अर्जाला सयाजी विश्‍वनाथ माकोणे हे सूचक तर अंजनाबाई सयाजी माकोणे हे अनुमोदक आहेत. धनंजय एकनाथ माकोणे (रा. वाटापूर) यांच्या अर्जाला सयाजी विश्‍वनाथ माकोणे हे सुचक तर अंजनाबाई सयाजी माकोणे हे अनुमोदक आहेत. बबन पुंजाजी दरंदले (रा. लांडेवाडी) यांच्या अर्जाला पांडुरंग बाबुराव दरंदले हे सूचक तर सुधाकर नानासाहेब दरंदले हे अनुमोदक आहेत. कर्णासाहेब धर्माजी औटी (रा. वाटापूर) यांच्या अर्जाला रामकिसन भगवान औटी हे सूचक तर नारायण भगवान औटी हे अनुमोदक आहेत. बाबासाहेब किसनदेव गडाख (रा. गणेशवाडी) यांच्या अर्जाला संजय दत्तात्रय गडाख हे सूचक तर प्रमोद रमेश गडाख हे अनुमोदक आहेत.

नेवासा गट
नेवासा गटातून काल 8 अर्ज दाखल झाले. नारायण सुर्यभान लोखंडे यांच्या अर्जाला दत्तात्रय सूर्यभान शेटे हे सुचक तर आबासाहेब मारुती लोखंडे हे अनुमोदक आहेत. बापूसाहेब परसराम गायके यांच्या अर्जाला सुशिलाबाई गेणू कोल्हे हे सुचक तर ज्ञानेश्‍वर गणपत गायके हे अनुमोदक आहेत. भाऊसाहेब गेणदास जाधव (रा. निंभारी) यांच्या अर्जाला पांडुरंग सोपान जाधव हे सुचक तर ओंकारराव बाबाजी जाधव हे अनुमोदक आहेत. नानासाहेब पुंडलिक पवार (रा. निंभारी) यांच्या अर्जाला मंदाकिनी बाबासाहेब पवार या सुचक तर चंद्रकांत पुंडलिक पवार हे अनुमोदक आहेत. नानासाहेब बन्सी चिंधे (रा. माळीचिंचोरे) यांच्या अर्जाला नानासाहेब हरिभाऊ चिंधे हे सूचक तर नितीन सूर्यभान चिंधे हे अनुमोदक आहेत. रवींद्र शिवाजी चिंधे यांच्या अर्जाला बापूसाहेब भाऊसाहेब चिंधे हे सुचक तर स्मिता बापूसाहेब चिंधे या अनुमोदक आहेत.

प्रवरासंगम गट
प्रवरासंगम गटासाठी काल तीन अर्ज दाखल झाले. पांडुरंग श्रीरंग निपुंगे (रा. मुकिंदपूर) यांच्या अर्जाला राजेश दत्तात्रय जगताप हे सुचक तर दत्तात्रय विनायक मते हे अनुमोदक आहेत. शिवाजी गंगाधर मते (रा. बकुपिंपळगाव) यांच्या अर्जाला अर्जुन परसराम भांगे सुचक तर भाऊसाहेब आसाराम देशमुख अनुमोदक आहेत. सीताराम मुरलीधर जाधव (रा. गोधेगाव) यांच्या अर्जाला भगवान शेषराव आगळे हे सूचक तर रघुनाथ मुरलीधर पठाडे हे अनुमोदक आहेत.

सहकारी संस्था
सहकारी संस्था सभासद राखीवसाठी सारंग कोंडीराम फोपसे (रा. तामसवाडी) यांचा अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जाला मुक्ताबाई सीताराम गर्जे सुचक तर सुरेश प्रल्हाद जंगले अनुमोदक आहेत.

अनुसूचित जाती जमाती
अनुसूचित जाती जमाती राखीव जागेसाठी सुनील नाथा वैरागर (रा. घोडेगाव) यांचा अर्ज काल दाखल झाला. त्यांच्या अर्जाला भाऊसाहेब लक्ष्मण येळवंडे हे सूचक तर लहू नाथू आढाव हे अनुमोदक आहेत.

महिला प्रतिनिधी
महिला प्रतिनिधी राखीव करिता काल तीन अर्ज दाखल झाले. विद्या संजय घावटे (रा. लांडेवाडी, सोनई) यांच्या अर्जाला पांडुरंग रंगनाथ लांडे हे सुचक तर बापूसाहेब शंकर घावटे अनुमोदक आहेत. सुनीता बाबुराव चौधरी (रा. चांदा) यांच्या अर्जाला ज्ञानदेव मारुती भगत हे सूचक तर सुभाष ज्ञानदेव चौधरी हे अनुमोदक आहेत. कृष्णाबाई आनाभाऊ जाधव (रा. निंभारी) यांच्या अर्जाला विवेक आनाभाऊ जाधव सूचक तर विशाल आनाभाऊ जाधव अनुमोदक आहेत.

इतर मागास राखीव
इतर मागास राखीव साठी काल 5 अर्ज दाखल झाले. एकनाथ विठ्ठल रौंदळ (रा. कांगोणी) यांच्या अर्जाला संजय रंगनाथ सोनवणे सुचक तर सविता संजय सोनवणे अनुमोदक आहेत. विनायक किसन पुंड (रा. करजगाव) यांच्या अर्जाला अमोल भाऊसाहेब टेमक सूचक तर रामदास सोमाजी बाचकर अनुमोदक आहेत. भाऊसाहेब गेणदास जाधव (रा. निंभारी) यांच्या अर्जाला पांडुरंग सोपान जाधव सूचक तर ओंकारराव बाबाजी जाधव अनुमोदक आहेत. रमेश धृपत कोलते (रा. तामसवाडी) यांच्या अर्जाला बाबासाहेब बाजीराव फोपसे सुचक तर सुभाष भानुदास कोलते अनुमोदक आहेत. आप्पासाहेब मच्छिंद्र जाधव (रा. निंभारी) यांच्या अर्जाला भगीरथ आप्पासाहेब जाधव सूचक तर भागुबाई चंद्रकांत पवार अनुमोदक आहेत.

भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग
भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गाकरीता राखीव जागेसाठी काल 6 अर्ज दाखल झाले. चांगदेव आनंदा दहिफळे (रा. गणेशवाडी) यांच्या अर्जाला संजय विठ्ठल दहिफळे हे सुचक तर आदिनाथ सत्यवान दहिफळे हे अनुमोदक आहेत. पोपट हरिभाऊ जिरे (रा. नेवासा) यांच्या अर्जाला सुखदेव मोहन मंडलिक हे सूचक तर पोपट किसन गवळी हे अनुमोदक आहेत. कारभारी काशिनाथ डफाळ (रा. सोनई) यांच्या अर्जाला कृष्णा काशीनाथ कसबे हे सूचक तर भाऊसाहेब महादू टिक्कल हे अनुमोदक आहेत. रामदास लक्ष्मण घुले (रा. माका) यांच्या अर्जाला सुदाम नामदेव घुले हे सूचक तर सुभाष दशरथ घुले अनुमोदक आहेत. बाळासाहेब विश्‍वनाथ तांदळे (रा. गणेशवाडी) यांच्या अर्जाला ज्ञानदेव मुरलीधर दरंदले हे सुचक तर रामदास संपत दरंदले हे अनुमोदक आहेत. राजपालसिंह भगीरथसिंह जनवीर (रा. सोनई) यांच्या अर्जाला सुधाकर गजाबपू वरघुडे हे सूचक तर भगवान सोपान बानकर हे अनुमोदक आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!