Saturday, April 27, 2024
Homeनगर‘मुळा’च्या निवडणुकीसाठी चौथ्या दिवसअखेर 117 अर्ज दाखल

‘मुळा’च्या निवडणुकीसाठी चौथ्या दिवसअखेर 117 अर्ज दाखल

चौथ्या दिवशी 65 अर्ज दाखल; आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

नेवासा (तालुका वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या 16 एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या चौथ्या दिवशी एकूण 65 अर्ज दाखल झाल्याने चौथ्या दिवसअखेर अर्ज दाखल झालेल्या इच्छुकांची संख्या 117 झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा आज शुक्रवारचा शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

काल चौथ्या दिवशी दाखल झालेले अर्ज (कंसात चौथ्या दिवसअखेर एकूण दाखल अर्ज) पुढीलप्रमाणे -सोनई गट 6 (11), घोडेगाव गट 7 (12), खरवंडी गट 12 (18), करजगाव गट 10 (17), नेवासा गट 5 (13), प्रवरासंगम गट -5 (9), सहकारी संस्था राखीवमधून 2(3), अनुसूचित जाती जमाती राखीव साठी 0 (1), महिला प्रतिनिधी राखीवसाठी 7 (10), इतर मागास साठी 5(11) तर भटक्या विमुक्त जाती विशेष प्रवर्गासाठी 6 (12). एकूण- 65 (117).

सोनई गट
उत्पादक सभासद सर्वसाधारण मतदार संघाच्या सोनई गटातून सुनील रावसाहेब विरकर(रा. धनगरवाडी), रेवणनाथ मिठ्ठू निमसे (रा. श्रीरामवाडी, सोनई), ज्ञानेश्वर आसाराम बेल्हेकर (रा. बेल्हेकरवाडी), एकनाथ आसाराम जावळे (सोनई), पाराजी नारायण विरकर (धनगरवाडी), रावसाहेब नाथा राशिनकर (रा. दत्तनगर, सोनई)

घोडेगाव गट
आप्पासाहेब जानकाजी शिंदे (रा. मांडेगाव्हाण), रमेश निवृत्ती कराळे (रा. माका), अण्णासाहेब आसराजी केदार (रा. महालक्ष्मी हिवरे), लक्ष्मण तुळशीराम पांढरे (रा. माका), दत्तात्रय भानुदास बर्‍हाटे (रा. घोडेगाव), राजेश नानासाहेब रेपाळे (घोडेगाव), दिलीप शंकर लोखंडे (घोडेगाव).

खरवंडी गट
खरवंडी गटातून काल 12 अर्ज दाखल झाले. विठ्ठल जिजाबा आहेर (म्हाळसपिंपळगाव), भागचंद मुरलीधर ठोंबळ (कांगोणी), पोपट लक्ष्मण कुर्‍हाट (शिंगणापूर), बाबासाहेब अंबादास जगताप (तामसवाडी), सोपान विठ्ठल विरकर (कांगोणी), राजाराम शंकर फोपसे (तामसवाडी), पोपट भाऊराव ठोंबळ (कांगोणी), रमेश रंगनाथ भोगे (खरवंडी), अजित रामचंद्र फाटके (खरवंडी), नामदेव एकनाथ भोगे (खरवंडी), प्रविण पोपट भोगे (खरवंडी), आबासाहेब जबाजी फाटके (खरवंडी).

करजगाव गट
करजगाव गटातून काल 10 अर्ज दाखल झाले. दामोधर दशरथ टेमक (करजगाव), सरस्वती लक्ष्मण जाधव (शिरेगाव), भास्कर नारायण दरंदले (लांडेवाडी), संदिप विश्वनाथ जाधव (शिरेगाव), पाराजी फकिरा गुडधे (पानेगाव), चंद्रभागाबाई कर्णासाहेब जाधव (शिरेगाव), किरण लक्ष्मण जाधव (शिरेगाव), भाऊसाहेब दामोधर लांडे (लांडेवाडी), पांडुरंग विश्वानाथ माकोणे (वाटापूर), रमेश प्रल्हाद जाधव (शिरेगाव).

नेवासा गट
नेवासा गटातून काल 5 अर्ज दाखल झाले. बाबासाहेब शिवाजी भणगे (भानसहिवरा), बापूसाहेब तुकाराम गायकवाड (उस्थळ दुमाला), तुळशीदास नामदेव पवार (निंभारी), नंदकुमार लक्ष्मण पाटील (नेवासा), राजेंद्र नामदेव घोरपडे (नेवासा बुद्रुक)

प्रवरासंगम गट
प्रवरासंगम गटासाठी काल 5 अर्ज दाखल झाले. जनार्धन नाथा हारदे (माळेवाडी दुमाला), ताराबाई सुखदेव पंडीत (मुकिंदपूर), शैला ज्ञानेश्वर झगरे (जळके बुद्रुक), गोरक्षनाथ तुकाराम कोतकर (जायगुडे आखाडा), बाळासाहेब दादा पाटील (माळेवाडी खालसा)

सहकारी संस्था
सहकारी संस्था सभासद राखीवसाठी काल गुरुवारी दोन अर्ज दाखल झाले. नानासाहेब काशिनाथ तुवर (खेडलेपरमानंद) व आबासाहेब जबाजी फाटके (खरवंडी).

अनुसूचित जाती जमाती
अनुसूचित जाती जमाती राखीव जागेसाठी तिसर्‍या दिवसअखेर एक अर्ज दाखल झाला होता. काल चौथ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.

महिला प्रतिनिधी
महिला प्रतिनिधी राखीव करीता काल 7 अर्ज दाखल झाले. ताराबाई विठ्ठल पंडीत (मुकिंदपूर), पुष्पांजली रेवणनाथ निमसे (सोनई), शकुंतला दत्तात्रय झगरे (जळके बुद्रुक), पद्मावती मदन डोळे (वंजारवाडी), उज्वला अरुण सावंत (रस्तापूर), नंदा गोरक्षनाथ सोनवणे (घोडेगाव), विमलबाई नारायण सोनवणे (घोडेगाव).

इतर मागास राखीव
इतर मागास राखीव साठी काल 5 अर्ज दाखल झाले. रमेश निवृत्ती कराळे (माका), रोहिदास मच्छिंद्र रोडे (गोणेगाव), एकनाथ आसाराम जावळे (चांदा), पोपट भाऊराव ठोंबळ (कांगोणी), नंदकुमार लक्ष्मण पाटील (नेवासा).

भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग
भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गाकरीता राखीव जागेसाठी काल 6 अर्ज दाखल झाले. राजाराम चिमा कुसळकर (सोनई) यांचे दोन अर्ज तसेच सुनील रावसाहेब विरकर (धनगरवाडी), लक्ष्मण तुळशीराम पांढरे (माका), सोपान विठ्ठल विरकर (कांगोणी), लक्ष्मण दगडू रुपनर (बकुपिंपळगाव).

- Advertisment -

ताज्या बातम्या