छाननीत ‘मुळा’चे 48 उमेदवारी अर्ज ठरले अवैध

jalgaon-digital
3 Min Read

महिला राखीवमधील सर्वाधिक 9 अर्ज अवैध; सोनई गट व सहकारी संस्थांचे सर्व अर्ज वैध; 7 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत

नेवासा (तालुका वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अर्जांच्या छाननीत एकूण दाखल 186 अर्जांपैकी 48 अर्ज अवैध ठरले असून त्यामुळे वैध अर्जांची संख्या 138 इतकी राहिली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 7 मार्चपर्यंत असल्याने त्याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या 16 एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. शुक्रवारअखेर 186 अर्ज दाखल झाले होते. काल सोमवारी अर्जांची छाननी झाली. यात 48 अर्ज अवैध ठरल्याने वैध अर्जांची संख्या 138 इतकी आहे. सर्वाधिक 9 अवैध अर्ज महिला राखीवमधून आहेत. तर सोनई गट व सहकारी संस्था प्रतिनिधी गटातून एकही अर्ज अवैध ठरला नाही.

सोनई गटातून दाखल सर्व 17 अर्ज वैध ठरले. घोडेगाव गटातील 18 पैकी 5 अर्ज अवैध ठरल्याने 13 अर्ज राहिले आहेत. खरवंडी गटातील 26 पैकी 3 अर्ज अवैध ठरल्याने येथे 23 वैध अर्ज आहेत. करजगाव गटातील 22 पैकी 8 अर्ज अवैध ठरले असून येथे 14 अर्ज वैध आहेत. नेवासा गटातील 21 पैकी 7 उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने 14 उमेदवारांचे अर्ज वैध आहेत.

प्रवरासंगम गटातून अर्ज भरलेल्या 17 उमेदवारांपैकी एक अर्ज अवैध ठरल्याने येथे 16 अर्ज वैध आहेत. सहकारी संस्था गटातील दाखल सर्व चारही अर्ज वैध ठरलेले आहेत. अनुसूचित जाती जमाती राखीवसाठी दाखल 6 पैकी 4 अर्ज अवैध ठरले असून येथून दोनच अर्ज आहेत. महिला राखीवच्या 20 पैकी 9 अर्ज अवैध ठरल्याने 11 अर्ज वैध आहेत.

इतर मागास च्या 18 उमेदवारांपैकी 7 अर्ज अवैध ठरल्याने 11 वैध अर्ज आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवगारतून दाखल 17 अर्जापैकी 4 अर्ज अवैध ठरल्याने 13 अर्ज वैध आहेत. अशाप्रकारे एकूण दाखल 186 अर्जांपैकी 48 अर्ज अवैध ठरल्याने वैध अर्जांची संख्या 138 इतकी आहे.

आज मंगळवार दि. 24 मार्च ते 7 एप्रिल या काळात अर्ज मागे घेता येणार असून 7 एप्रिललाच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अवैध उमेदवारी अर्ज

घोडेगाव गटातून वसंत सोनवणे, रमेश कराळे, बन्सी ढेरे, भाऊसाहेब बर्‍हाटे, संतोष सोनवणे. खरवंडी गटातून भागचंद ठोंबळ, रमेश भोगे व मुकूंद भोगे. करजगाव गटातून विनायक पुंड, विनायक माकोणे, धनंजय माकोणे, सरस्वती जाधव, संदिप जाधव, पाराजी गुडधे, राजेंद्र जंगले व केशव औटी. नेवासा गटातील भाऊसाहेब जाधव, रवींद्र चिंधे, तुळशीदास पवार, विक्रम भणगे, अच्युत घावटे, त्रिंबक सुकाळकर व संदीप शिंदे. प्रवरासंगम गटातील शैला ज्ञानेश्‍वर झगरे यांचा अर्ज अवैध ठरला. अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून सुनील नाथा वैरागर, रत्नाकर किसन बोरुडे, सुनील गायकवाड व विद्यादेवी शेंडे. महिला प्रतिनिधी राखीव मतदारसंघातील सुनीता चौधरी, पुष्पांजली निमसे, शकुंतला झगरे, उज्वला सावंत, स्मिता चिंधे, विठाबाई जाधव, मनीषा कोलते, शशिकला ठोंबळे व हिराबाई लोखंडे. इतर मागासवर्ग राखीव मतदारसंघातील विनायक पुंड, भाऊसाहेब जाधव, रमेश कराळे, रोहिदास रोडे, पोपट होले, भागचंद ठोंबळ व त्रिंबक सुकाळकर. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गाकरिता राखीव मतदारसंघातील पोपट जिरे, बाळासाहेब तांदळे, राजाराम कुसळकर (दोन अर्ज) हे अर्ज अवैध ठरले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *