Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुळा, भंडारदरा व निळवंडे कालवा सल्लागार समितीची सोमवारी बैठक

Share
मुळा, भंडारदरा व निळवंडे कालवा सल्लागार समितीची सोमवारी बैठक, Latest News Mula Bhadardara Nilwand Meeting Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा, भंडारदरा व निळवंडे धरण कालवा सल्लागार समितीची बैठक ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 20 जानेवारी 2020 रोजी दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी रब्बी व उन्हाळी आवर्तनांचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

कोेल्हापूरच्या पालकमंत्रिपदी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची तर नगरच्या पालकमंत्रिपदी कोल्हापूरचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांनी नियुक्ती करण्यात आली होती. पण पालकमंत्रिपद आपण घेणार नाही हे पद दुसर्‍यास देण्यात यावे असे ना. थोरात यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्रीपद ना. हसन मुश्रीफ यांना देण्यात यावे अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थकांनी केली होती.

त्यात या पदासाठी हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात चुरस होती. अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाटील यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करून हा वाद निकाली काढला. ना. मुश्रीफ हेच नगरचे पालकमंत्री कायम असल्याचे निश्चत झाले. त्यामुळे आता त्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे.

या बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, ना. प्राजक्त तनपुरे, ना.शंकरराव गडाख, आ. लहू कानडे, आ. डॉ. किरण लहामटे यांच्यासह अन्य प्रतिनिधी तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मुबलक पाणीसाठा
भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणात कधी नव्हे एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात सध्या पाणीसाठा 24916 दलघफू पाणीसाठा आहे. गतवर्षी याच काळात या धरणात केवळ 9300 दलघफू पाणीसाठा होता. भंडारदरा वार्ताहराने कळविले की, सध्या भंडारदरात सध्या 10844 दलघफू, निळवंडेत 7942 दलघफू पाणीसाठा आहे. गतवर्षी भंडारदरात केवळ 4665 दलघफू पाणी होते. सध्या आवर्तनासाठी दोन्ही धरणाचे तब्बल 18786 दलघफू पाणीसाठा उपलब्ध आहे. कधी नव्हे एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याने आवर्तनापोटी शेतकर्‍यांना मुबलक पाणी मिळू शकते. रब्बीचे एक आणि उन्हाळी तीन असे शेतीसाठी आवर्तनाचे नियोजन होण्याची शक्यता आहे.

रब्बीऐवजी उन्हाळी आवर्तनात पाण्याची मागणी वाढणार
भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातून रब्बीच्या आवर्तनासाठी शेतकर्‍यांकडून पाण्याची मागणी फारशी आलेली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने दुसर्‍यांदा पाणी मागणीसाठी मुदत दिलेली आहे. ही मुदत 29 जानेवारीपर्यंत आहे. सध्या बंधारे आणि विहिरींना पाणी असल्याने शेतकरी रब्बीच्या आवर्तनासाठी पाण्याची मागणी करण्यास नाखूश आहेत. पण लाभक्षेत्रात ऊस, गहू आणि कांद्याची लागवड उशीरा झालेली आहे. त्यामुळे उन्हाळी आवर्तनासाठी शेतकर्‍यांकडून पाण्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!