Type to search

Featured हिट-चाट

रणवीर कडे माझा चष्मा कसा?; धोनीची मुलगी झिवाचा सवाल

Share

मुंबई | वृत्तसंस्था

सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी रणवीर ब्युटी अवार्ड्समध्ये उपस्थित होता. यावेळी रणवीरने काळा कोट, काळी टोपी आणि काळा स्टाइलिश चष्मा घातला होता. त्याचा हा हटके लुक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याने आपली मुलगी झीवाचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटो मध्ये झीवाने रणवीर सारखाच चष्मा घातला आहे. धोनीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये या फोटोबद्दलची जी माहिती दिली आहे, ती वाचून तुम्ही देखील हसाल.

धोनीने लिहले आहे की, झीवाने जेव्हा रणवीरचा फोटो बघितला, तेव्हा ती म्हणाली, यांनी माझा चष्मा का घातला आहे ? ती तात्काळ वरच्या मजल्यावर गेली आणि स्वत:चा चष्मा शोधू लागली व म्हणाली की, माझा चष्मा केवळ माझाच आहे.

मी तर नोटीस देखील केले नव्हते की, त्या दोघांकडे एकसारखाच चष्मा आहे. पुढच्या वेळेस रणवीरला भेटल्यावर ती नक्की म्हणेल की, माझ्याकडे देखील तुमच्या सारखाच चष्मा आहे.

धोनीने शेअर केलेला रणवीर आणि झीवाचा फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर कमेंट करत रणवीर देखील झीवाला कुल असल्याचे म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!