Wednesday, April 24, 2024
Homeनगरग्रामीण विकासासाठी रस्ते हाच केंद्रबिंदू

ग्रामीण विकासासाठी रस्ते हाच केंद्रबिंदू

खासदार डॉ. विखे पाटील : नांदगाव-वांबोरी रस्त्याचे भूमिपूजन

अहमदनगर (प्रतिनिधी) – ग्रामीण विकासासाठी व समृद्धीसाठी गावापर्यंत कामे जोपर्यंत व्यवस्थित होत नाहीत, तोपर्यंत ग्रामविकासात सुधारणा होणार नाही. ग्रामीण विकासासाठी रस्ते हाच केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपाद खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

जिल्हा वार्षिक नियोजन 5054 अंतर्गत नांदगाव-वांबोरी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नांदगावचे सरपंच सुनीता सरक, अशोक बकरे, प्रशांत थोरात, वैभव आघाव, राजकुमार आघाव, पंचायत समितीचे व्ही.डी.काळे, सरपंच किसन धनवटे, सेवा संस्थेचे अध्यक्ष कैलास डावरे, मेजर संतोष काळे, विळदचे माजी सरपंच रमेश जवरे, भाऊसाहेब काळे, विनायक शिंदे व धामोरी नांदगाव शिंगवे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले, लोकसभा प्रचाराच्या वेळी आपण नांदगाव-वांबोरी रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. जोपर्यंत गाव-वाड्या शहरांना चांगल्या रस्त्याने जोडले जात नाहीत. दळणवळण करण्याच्या सुविधा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ग्रामीण विकासाला चालना मिळणार नाही.

जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव शहरांना, महामार्गांना जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेले बाह्यवळण रस्ता, सोलापूर-नगर रस्ता राष्ट्रीय महामार्ग यासंदर्भात लोकसभेच्या अधिवेशात मांडले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांमध्ये नगर-मनमाड महामार्गाचे मजबुतीकरण व नूतनीकरण चा संदर्भातला प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करत आहोत. तसेच शासकीय निधीतून आपण रस्ते तयार करण्याचे प्रस्ताव तयार करावेत असे आव्हान त्यांनी ग्रामस्थांना केले.

यावेळी देहरे ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार डॉ. विखे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी रेल्वे भुयारी मार्ग, महानगरपालिका पाईपलाईन स्थलांतरावर करण्याबाबत निवेदन व के. के. रेंजबाबत डॉ. विखे यांचे लक्ष वेधले. त्यांनी नांदगाव, देहेर, येथे विविध विकास कामांचा शुभारंभ केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या