Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

खा. सुळे आज जिल्हा दौर्‍यावर; विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी (दि.27) जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी सिडकोतील भोळे मंगल कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत बैठक होईल. याबरोबरच नाशिक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

दरम्यान, पक्षाचे नेते आमदार छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. या परिस्थितीत कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीने आता जोरदार तयारी सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी 9.30 ते 11 वाजता भोळे मंगल कार्यालय, अंबड लिंकरोड, येथे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार आहे.

तर सकाळी 11.30 ते 1 या वेळेत राष्ट्रवादी कार्यालय, मुंबई नाका येथे नाशिक शहर व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी 4 वाजता नांदगाव येथे नांदगाव विधानसभा मतदारसंघाची बैठक होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!