आईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा

आईच्या दुःखात ही त्यांनी जपली कर्तव्यनिष्ठा
– संदीप वाकचौरे
संगमनेर- एकीकडे राज्यात कोरोनोचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले आहे . शासकीय अधिकारी म्हणून समाजातील लोकांची काळजी घेणे  आपली जबाबदारी आहे.अशी जबाबदारी पार पाडत असतानाच आईचे निधन झाले. एकीकडे कर्तव्याची जाणीव आणि दुसरीकडे आईच्या मृत्यूचे दुःख अशा परिस्थितीत संगमनेर प्रांतअधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी आईचा अंत्यविधीचे सोपस्कर करून पुन्हा दिड दिवसात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कर्तव्य भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्र पाठवून कौतुक केले आहे
संगमनेर येथे प्रांताधिकारी म्हणून शशिकांत मंगरुळे कार्यरत आहेत त्यामुळे या विभागाची जबाबदारी त्यांच्यावरतीच आहे.कोरोनोचा  प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाकडून निघणारे आदेशाची अंमलबजावणी व लोकांना या परिस्थितीत  सामोरे जाताना अडचणी येऊ नये म्हणून जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांच्या आईच्या निधनाचे वृत्त येऊन धडकले . अशा प्रसंगी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याना सूचना केल्या आणि स्वतःच्या वाहनाने अंत्यविधीसाठी जळगावकडे निघाले. अंत्यविधीला जात असताना देखील आपल्यावर असलेल्या जबाबदारी चे भान ठेवत आढावा घेणे, सूचना करणे सुरु होते.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com