Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशअंदमानमध्ये मान्सून दाखल !

अंदमानमध्ये मान्सून दाखल !

नवी दिल्ली – नैर्ऋत्य मान्सून रविवारी अंदमानच्या सीमेवर दाखल झाला आहे. अनुकूल स्थिती असल्याने पुढील 24 ते 48 तासांत संपूर्ण अंदमान-निकोबार बेट मान्सूनच्या कवेत राहील, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
मान्सूनच्या प्रवासासाठी सध्याची स्थिती पोषक आहे. अंदमानच्या सीमावर्ती भागात रविवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, मौसमी वार्‍यांना गती मिळत असल्याने, मान्सूनचा पुढील प्रवासही सुरू झाला आहे. दोन दिवसांत तो अंदमान व्यापेल आणि त्यानंतर तो श्रीलंकेकडे कूच करेल. श्रीलंकेचा सीमावर्ती भाग व्यापल्यानंतर तो केरळकडे येईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

केरळात मान्सून 5 जून रोजी दाखल होणार असल्याचा आमचा अंदाज आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यातून निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आणखीच पोषक स्थिती निर्माण झाली असल्याने दोन दिवस आधीही केरळात मान्सूनचे आगमन होऊ शकते.

- Advertisement -

मान्सून महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत – अनुकूल हवामान लाभले, तर महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत तो दाखल होईल, असा अंदाज आहे. दिल्लीत मान्सून 23 जून ऐवजी 27 जून रोजी दाखल होईल. हवामान विभागाच्या मते, यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 100 टक्के राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या