Friday, April 26, 2024
Homeनगरगोदावरी खोर्‍याच्या पाणी प्रश्नाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी – आ. विखे

गोदावरी खोर्‍याच्या पाणी प्रश्नाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी – आ. विखे

राहाता (तालुका प्रतिनिधी) – गोदावरी खोर्‍याचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस जटिल व प्रादेशिक अस्मितेचा होत असल्याने निर्माण झालेल्या पाण्याच्या प्रादेशिक वादावर तातडीने तोडगा काढावा. प्रवाही व उपसा सिंचन योजनांद्वारे गोदावरी खोर्‍यात पाणी वळवावे यासाठी गोदावरी खोर्‍याच्या पाणी प्रश्नाबाबत युती सरकारने घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

नाशिक येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या विभागीय आढावा बैठकीत आमदार विखे पाटील यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळवून या भागातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी केली. या विषयावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडून निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.

- Advertisement -

या निवेदनात आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, गोदावरीचे खोरे हे तुटीचे ओळखले जाते. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने नगर, नाशिक, मराठवाडा या भागांमध्ये पाण्यावरुन प्रादेशिक वाद निर्माण होतात. यासाठी जास्तीचे पाणी उपलब्ध करणे हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सुचित केले. पद्मभूषण स्व. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र पाणी परिषदेने अभ्यासपूर्ण सादर केलेला प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेला आहे याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या