Thursday, April 25, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानमधील कोणत्याही कामगारांच्या पगारात कपात करु नये

साईबाबा संस्थानमधील कोणत्याही कामगारांच्या पगारात कपात करु नये

आ. विखे पाटील यांची संस्थान विश्वस्तांकडे मागणी

शिर्डी (प्रतिनिधी)- करोना संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत साईबाबा संस्थानमधील कोणत्याही कामगारांच्या पगारात कपात करु नये अथवा त्यांना कमी करु नये, अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था समितीच्या सदस्यांना केली आहे. संस्थानमधील कामगारांच्या पगारात कपात आणि काही कामगारांना सेवेतून कमी करण्यात येणार असल्याची बाब आ. विखे पाटील यांच्या निदर्शनास काही कामगारांनी आणून दिली.

- Advertisement -

सध्या संस्थानच्या व्यवस्थेचा कार्यभार हा तीन सदस्यांच्या समितीकडे आहे. या सदस्यांना एका पत्राव्दारे आ. विखे पाटील यांनी कामगारांच्या प्रश्नाबाबतची भूमिका विषद केली. संस्थानचा कारभार हा राज्य शासनाच्या ध्येय धोरण व कायद्यानुसार चालतो. केंद्र व राज्य शासनाने कोणत्याही अस्थापनांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करु नये अथवा कर्मचार्‍यांना कामावरुन दुर करु नये, असे धोरण घेतले असल्याने शासन धोरणाच्या विपरीत संस्थान कृती कशी करु शकते, असा सवालही त्यांनी पत्रात उपस्थित केला.

संस्थानच्या सेवेत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना पगार कपातीमुळे अथवा सेवेतून कमी केल्यामुळे मोठ्या आर्थिक आरिष्ट्यास सामोरे जावे लागेल. त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होईल या सर्व कर्मचार्‍यांनी मेहनतीने साईभक्तांनी व संस्थानची सेवा केलेली आहेच ही बाब लक्षात घेवून उत्पन्न कमी झाले म्हणुन कामगारांबाबत तातडीने निर्णय करणे हे योग्य होणार नाही. पगात कपात करण्याऐवजी अनावश्यक उपक्रमांना फाटा देवून बचतीचे उपाय स्विकारुन कामगारांना दिलासा द्यावा, अशी विनंती आ.विखे पाटील यांनी तदर्थ समितीस केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या