Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शासकीय जागेवर अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा

Share
शासकीय जागेवर अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा, Latest News Mla Kanade Statement Action Order Shrirampur

श्रीरामपुरातील आढावा बैठकीत आमदार कानडे यांच्या अधिकार्‍यांना सूचना

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शासकीय जमिनीवर अतिक्रमणे करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करावी, अशा सूचना आमदार लहू कानडे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. सन 2019-20 या आर्थिक वर्षातील योजनानिहाय खर्चाचा आढावा व सन 2020-21 आर्थिक वर्षातील अंदाज पत्रकामध्ये समाविष्ट करावयाची कामे याचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये बैठक पार पडली. त्यावेळी अधिकार्‍यांना त्यांनी सूचना दिल्या.

बैठकीला तहसीलदार प्रशांत पाटील, प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, इंद्रभान थोरात, उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, दिलीप नागरे, कॉ. अण्णासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, श्रीनिवास बिहाणी, सतीश बोर्डे, नानासाहेब पवार, पं. स. सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, तालुका भूमापन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण सर्व उपअभियंता, बांधकाम व सर्व विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

आमदार लहू कानडे यांनी प्रारंभीच सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन डिसेंबर अखेरपर्यंत विविध विभागांना प्राप्त झालेल्या निधीपैकी किती खर्च झाला व या आर्थिक वर्षापूर्वी 100 टक्के निधी खर्च करण्याचे काय नियोजन केले याची माहिती घेतली. बहुतेक विभागाचा मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित राहील याबाबत नाराजी व्यक्त करून तो वेळेमध्ये खर्च करण्याच्या सूचना दिल्या. ज्या विभागांचा निधी परत जाईल त्या विभागाच्या अधिकार्‍याला जबाबदार धरण्यात येईल असे त्यांनी बजावले.

आढावा बैठकीमध्ये श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी त्यांच्याकडे जमा खर्चाचा आढावा घेऊ शकले नाहीत. माझ्याकडे प्रभारी चार्ज असल्याने मला माहीत नाही असे त्यांनी सांगितले. तेव्हा आमदार कानडे यांनी सर्व शासकीय योजनांची माहिती घेऊन नगरपालिकेमध्ये बैठक लावावी असे सुचविले. यावेळी अनेक तक्रारी उपस्थित केल्या. त्यामध्ये विशेष शासकीय जमिनीवरील विषय होता. शिरसगाव येथील सरकारी भूखंडात एका ग्रामपंचायत सदस्याने अनधिकृतरित्या गाळे बांधकाम करून विक्री करत असल्याचा विषय समोर आला.

नाऊरच्या शाळा खोल्यांचा प्रश्न व सूतगिरणी येथील शाळा खोल्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावरही कार्यवाही करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यावेळी इंद्रभान थोरात यांनी खंडकरी शेतकर्‍यांच्या जमिनीबाबत व शेती महामंडळाच्या जमिनी वाटपाबाबत सुचना केल्या. बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर यांनी आकडे टाकून वीज चोरी होत असल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. श्रीनिवास बिहाणी यांनी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सरकारी जमिनींची खरेदी-विक्री खाजगी लोक करत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक संजय फंड यांनी शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असल्याबाबत व नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत खेद व्यक्त केला.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी कृषी विभागाकडील कामाची माहिती घेत असताना आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नामुळे तालुक्याला प्रथम 27 कोटी रुपयांचा नुकसानभरपाई निधी प्राप्त झाला याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार कानडे यांनी चांगले काम करणारे अधिकारी कर्मचार्‍यांना धन्यवाद देऊन संजय गांधी निराधार योजनेच्या फेब्रुवारीमध्ये बैठक घेण्याबाबत सूचना केल्या. तसेच सर्व सरकारी योजनांची माहिती व्हावी म्हणून 6 फेब्रुवारी 2020 रोजी पंचायत समितीची आमसभा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!