Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

Mission Chandrayaan 3: नोव्हेंबर २०२० मध्ये चंद्रावर लँडिंगचे लक्ष्य, इस्रोकडून मिशनच्या तयारीला सुरवात

Share

नवी दिल्ली:

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला पहिल्या प्रयत्नात चंद्रावर लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात चांद्रयान 2 मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशाचा अनुभव गाठिशी घेऊन आता इस्रो चांद्रयान 3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. इस्रोने चंद्रयान 3 मोहिमेवर काम सुरु केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या मोहिमेसाठी नोव्हेंबर 2020 पर्यंतचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

इस्रोने वेगवेगळया समित्या स्थापन केल्या असून ऑक्टोंबरपासून या समित्यांच्या आतापर्यंत चार उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत. चांद्रयान 2 मोहिमेतील ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे नव्या मोहिमेत फक्त लँडर आणि रोव्हरचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी चांद्रयान 3 संबंधी समितीची बैठक पार पडली. शास्त्रज्ञांच्या तीन उपसमित्यांनी प्रोप्लशन, सेन्सर्स, नॅव्हीगेशन आणि इंजिनिअरींगसंबंधी केलेल्या सूचनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!