Sunday, April 28, 2024
Homeनगरखडके, मोरेचिंचोरे व मुकिंदपूरच्या गौणखनिज उत्खननात शासनाला 30 कोटींचे नुकसान

खडके, मोरेचिंचोरे व मुकिंदपूरच्या गौणखनिज उत्खननात शासनाला 30 कोटींचे नुकसान

काकासाहेब गायके यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील खडके, मोरेचिंचोरे व मुकींदपूर येथे सुरू असलेल्या अनधिकृत गौण खनिज उत्खननात शासनाचे 30 कोटींचे नुकसान झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

- Advertisement -

श्री.गायके यांनी निवेदनात म्हटले की, नेवासा तालुक्यातील खडके येथे 12 हजार 521 ब्रास (दंड 12 कोटी), मोरेचिंचोरे येथे 6946 ब्रास (दंड 6 कोटी) तर मुकींदपूर येथे 12 हजार 558 ब्रास (दंड 12 कोटी) याप्रमाणे गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन केल्याचे पंचनामे नेवासा तहसीलदार व गौण खनिज शाखेने करून दंड वसुलीसाठी नोटिसा काढलेल्या आहेत. परंतु अद्यापही दंड वसुली केलेली नाही. सदर प्रकरणी दंड वसुलीच्या सक्त कारवाई करण्याची गरज होती.

अधिनियम 1966 चे कलम 176 ते 185 नुसार कारवाई करणे तसेच कसुरदारास मागणीची नोटिस काढण्यात आलेली आहे का? उद्घोषणेचा व समहरणाची लेखी नोटीस काढली असल्यास तसेच सदर व्यक्ती जंगम मालमत्ता अडकवून ठेवण्याची अधिपत्रक व नियमानुसार नमुना 3 मध्ये नेवासा तहसीलदार कार्यालयाने काढली आहे का? याचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात शासन गौण खनिज अधिनियमाचे पालन केल्याबाबत उपलब्ध असलेल्या माहितीवरून दिसून येत नाही.

त्यामुळे वसुली मुदत 31 मार्च 2019 अखेर शासनाला महसूल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शासनाचे नुकसान होत आहे. त्या नुकसानाची जबाबदारी जिल्हा गौण खनिज अधिकारी व नेवासा तहसीलदार यांची असून त्वरित नियमानुसार कारवाई करण्यात यावी. अन्यथा आपणास वैयक्तीक जबाबदार धरण्यात येईल. तसेच महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती नाजुक असून दंड रकमा वसूल करून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला त्वरित मिळाला पाहिजे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, महसूलमंत्री,गृहमंत्री, प्रांताधिकारी, नेवासा तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या