Type to search

Featured maharashtra

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी स्वीकारला कार्यभार

Share

मुंबई :

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी उद्योग, खनिकर्म, पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क व राजशिष्टाचार या विभागांचा कार्यभार स्वीकारला.

मंत्रालयात दालन क्र. 2, तळमजला, मुख्य इमारत हे त्यांचे कार्यालय आहे. यावेळी आमदार शेखर निकम, अनिकेत तटकरे, माजी आमदार संजयराव कदम, आई वरदा तटकरे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी मला देऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माझी जबाबदारी अधिक वाढली आहे.

या जबाबदारीतून जनतेचे काम प्रामाणिकपणे करुन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न असेल. युवकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या विकासासाठी काम करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!