Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

कृषी मंत्री, अधिकारी आठवड्यातून एकदा शेतकर्‍यांच्या बांधावर

Share
कृषी मंत्री, अधिकारी आठवड्यातून एकदा शेतकर्‍यांच्या बांधावर, Latest News Minister of Agriculture Dada Bhuse Announcement

कृषी मंत्री भुसे यांची नागपूरात घोषणा

नागपूर – शेतकर्‍यांना कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत कृषी मंत्री महिन्यातून एक दिवस शेतावर या उपक्रमात सहभागी होणार आहे. तसेच कृषी सचिव, आयुक्त यांनी पंधरवाड्यातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकार्‍यांनी दर आठवड्याला शेतकर्‍यांच्या शेतावर उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व कृषी उत्पादनासंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

नागपुरात वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे प्रगतीशील शेतकर्‍यांचा सत्कार कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी तथा वनामती संचालक रविंद्र ठाकरे, अकोला कृषी विद्यापीठाचे संचालक दिलीप मानकर, सहसंचालक रविंद्र भोसले, सुभाष नागरे, नागपूर कृषी विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, वनामतीचे अपर संचालक डॉ. अर्चना कडू, सी.पी.टी.पी. संचालक श्रीमती सुवर्णा पांडे आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री भुसे म्हणाले, शेतकर्‍यांची केवळ पारंपरिक शेतीवरच भिस्त नसावी तर त्यांचा शेतमाल थेट निर्यातीची क्षमता असणारा असावा. यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या थेट बांधावरच जावून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेणे गरजेचे आहे. सचिव, कृषी अधिकार्‍यांप्रमाणे मी देखील कृषी मंत्री या नात्याने दर आठवड्याला शेतकर्‍यांच्या शेतात भेट देवून पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत प्रत्यक्ष शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रश्न, उत्पादकता आणि उपलब्ध बाजारपेठ या विषयी त्यांना मार्गदर्शन करता येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!