Saturday, April 27, 2024
Homeनाशिकशाँक सर्किटमुळे किराणा दुकानाचे लाखोंचे नुकसान

शाँक सर्किटमुळे किराणा दुकानाचे लाखोंचे नुकसान

सातपूर | प्रतिनिधी

परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मंडई जवळील श्रीराम किराणा स्टोअर्स या किराणा दुकानाला आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागून दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरीही शाँक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -

सातपूर परिसरातील विविध विकास सहकारी सोसायटी गाळा न. 48 मध्ये जयेशभाई पटेल यांचे श्रीराम किराणा स्टोअर्स या किराणा मालाचे दुकान आहे. पहाटे साडेचार वाजता दुकानाच्या शटर खालून ज्वाळा बाहेर पडत असल्याचे परिसरातील नागरिक यांच्या लक्षात आले. नागरिकांनी महापालीकेच्या अग्नीशमन दलाला या आगीची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.

आग खुपच भडकाल्याने या आगीत दुकानातील सी. सी. टि. व्हि. कँमेरे, फर्निचर, तेलाचे डबे, साखरेचे पोते व सर्व प्रकारचे किराणा सर्व जळून खाक झाले. अंदाजे 10 ते 12 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न आग विझवली. अन्यथा शेजारी असलेल्या दुकानानाही झळ पोहचली असती. सामाजिक कार्यकर्ते किशोर मुंदडा, जितू लोहाडे, भरत पटेल, संजय मणियार, किशोर भट्टड, शिवाजी मटाले आदींनी या बाबत सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या