Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

गोव्यात मिग 29 लढाऊ विमान क्रँँश; दोन्ही पायलट थोडक्यात बचावले

Share

गोवा | वृत्तसंस्था

गोवा येथे भारतीय नौदलाचं ‘मिग 29 के’ हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान निर्मनुष्य भागात कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानातील दोन्ही पायलटनी प्रसंगावधान राखून पॅराशूटच्या मदतीने वेळीच उड्या मारल्याने बचावले आहेत.

हा अपघात दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला. गोव्यातील ‘आयएनएस हंसा’ हवाई तळावरून विमानाने उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच एक पक्षाने विमानाला धडक दिली. त्यानंतर तात्काळ विमानाच्या इंजिनने पेट घेतले. अपघातग्रस्त विमानात दोन पायलट होते.

इंजिनाला आग लागल्याचे समजताच दोन्ही पायलटांनी पॅराशूटच्या मदतीने तात्काळ खाली उडी मारली. स्थानिकांनी त्यांना तात्काळ मदत केली. लेफ्टनंट कमांडर दीपक यादव आणि कॅप्टन एम. शेवखंड अशी त्यांची नावे आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!