Type to search

Featured नाशिक

स्वच्छता सर्वेक्षणाला सामाजिक संस्थांचा सहभाग

Share

नाशिक | प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत शहरातील निमा, आयमा, क्रेडाई, लायन्स क्लब, रोटरी क्लब ऑफ इंडिया, सिटीझन फोरम, यांचे प्रमुख उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण 2020 यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी व नागरीकांचा प्रत्यक्ष सहभाग या बाबत उपायुक्त तथा मुख्य समन्वयक अधिकारी मनोज घोडे-पाटील यांचे अध्यक्षतेखाली व उपायुक्त तथा उदयान अधिक्षक शिवाजी आमले, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे बैठक राजीव गांधी भवन, मनपा नाशिक येथे आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी उपायुक्त तथा मुख्य समन्वयक अधिकारी मनोज घोडे-पाटील यांनी नाशिक शहर स्वच्छ सुंदर हरीत होणे कामी या सर्व फोरम च्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये शहरातील नागरीकांनी सहभागी असणे आवश्यक आहे व फोरमच्या माध्यमातून शहरातील मार्केट, व्यावसायिक या ठिकाणी लिटर बीन (डस्टबीन), शहरातील सार्वजनिक शौचालयच्या आजूबाजुचा परीसर सुशोभीकरण, भिंती चित्राव्दारे करणे व घर, सोसायटी तेथे जागीच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मीती होणे व त्यासाठी कल्चर उपलब्ध करुन देणे बाबत आवाहन करण्यात आले.

त्या अनुशंगाने फोरमने बैठकित सहमती दर्शविली तसेच निमाच्या वतीने 100 व लायन्स क्लबच्या वतीने 25 लिटर बीन (डस्टबीन) व घरगुती ओल्या कच-यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती होणे व त्यासाठी कल्चर उपलब्ध करुन देणेबाबत क्रेडाई 50 किलो, लायन्स क्लब 100 किलो व निमा कडून 50 किलो देणेबाबत अनुमती दर्शविली.

या बैठकीला स्वच्छ सर्वेक्षण 2020 साठी विविध बाबीवर फोरम सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्या अनुशंगाने कार्यवाही करणेबाबत सुचना देण्यात आल्या.बैठकीस उपायुक्त तथा उदयान अधिक्षक शिवाजी आमले, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, लायन्स क्लब, आयमा रोटरी क्लब सिटीझन फोरमचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!