Monday, April 29, 2024
Homeनगरराजकीय हेतूने बाजार समितीचे नामांतर नाही

राजकीय हेतूने बाजार समितीचे नामांतर नाही

शिवाजीराव कर्डिले : नगर बाजार समितीला दादा पाटील शेळके यांचे नाव

अहमदनगर (वार्ताहर) – माजी खासदार (स्व.) दादा पाटील शेळके हे चार वेळा आमदार तर दोन वेळा खासदार राहिले. जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांची राज्याला वेगळी ओळख होती. शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावून मोठया कष्टाने त्यांनी नगरचे नाव राज्याच्या व देशाच्या नकाशावर नेले, त्यामुळे बाजार समितीचे नामांतर कुठल्याही राजकीय हेतूने केले नसल्याचा टोला माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी लगावला.

- Advertisement -

नगर बाजार समितीचे कर्डिले यांच्या हस्ते शनिवारी (दि. 22) माजी खासदार (कै.) दादा पाटील शेळके असे नामांतर करण्यात आले. या प्रसंगी पोपटराव पवार यांना भारत सरकारतर्फे मिळालेल्या पद्मश्री सन्मानाबद्दल, तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याच्या सन्मानार्थ प्रताप पाटील शेळके यांचा नगर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अरुण जगताप होते. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब पाटील शेळके, दादाभाऊ चितळकर, पारनेर बाजार समिती चे प्रशांत गायकवाड, अविनाश घुले, युवानेते अक्षय कर्डिले, आदी उपस्थित होते. बाजार समितीचे उपसभती रेवणनाथ चोभे यांनी अध्यक्षीय निवड केली. कर्डिले म्हणाले, दादा पाटील यांच्या बोटाला धरूनच सर्व राजकारणात आले, त्यांच्या स्मृती चिरकाल रहाव्या यासाठी तसेच त्यांचे कार्य पाहून आम्ही बाजार समितीला नाव दिले.

आता आमदार नसल्याचे दुःख नसून जनता हीच आमचा देव धर्म आहे. सत्काराला उत्तर देताना पद्मश्री पवार म्हणाले, राज्याचे नेतृत्व करणार्‍या तालुक्याचे विभाजन झाले ही दुर्दैवी बाब आहे. पुढील काळात बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन पवार यांनी केले. शेळके म्हणाले, स्व. दादा पाटील हे कार्यकर्ते घडवायची मशीन होते. तालुक्याच्या विभाजनामुळे सर्व सामान्य माणसांची अडचण होत आहे. उद्याच्या काळात नगर तालुका स्वतंत्र मतदार संघ व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करा असे आवाहन शेळके यांनी पोपटराव पवारांना केले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रावसाहेब पाटील शेळके, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, बाबासाहेब गुंजाळ, शहर काँग्रेस अध्यक्ष माणिकराव विधाते, वैशाली कोतकर, संदीप कर्डिले, अभिलाष घिगे, दिलीप भालसिंग, संतोष म्हस्के, वसंत सोनवणे, राजेंद्र बोथरा, कानिफनाथ कासार, मीराबाई कार्ले, संतोष कुलट, बाबासाहेब खरसे, बाळासाहेब निमसे, बबनराव आव्हाड, बहिरू कोटकर, रावसाहेब साठे, बन्सी कराळे, बाबासाहेब जाधव, उद्धवराव कांबळे, जगन्नाथ मगर, सचिव अभय भिसे यासह तालुक्यातून आलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन तहसीलसाठी सर्वांचे एकमत
नगर शहरासाठी व तालुक्यासाठी दोन स्वतंत्र तहसील कार्यालये असावेत, असे मत माजी मंत्री कर्डिले, प्रताप पाटील शेळके यासह अन्य मान्यवरांनी व्यासपीठावर मांडले. या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. यासाठी महसूलमंत्र्यांना साकडे घालू असे प्रतिपादन पोपटराव पवार यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या