Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

भीम युपीआयद्वारे फेब्रुवारीत सर्वाधिक व्यवहार; कॅशलेस व्यवहारात विक्रमी वाढ

Share
भीम युपीआयद्वारे फेब्रुवारीत सर्वाधिक व्यवहार; कॅशलेस व्यवहारात विक्रमी वाढ Latest News Market BHIM UPI Processed 1.32 Billion Transactions in February

नाशिक : भारत इंटरफेस फॉर मनी अर्थात ‘भीम’ या युनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे (युपीआय) केल्या गेलेल्या व्यवहारांच्या संख्येत मागील महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी २०२० मध्ये विक्रमी वाढ झाली आहे. भीम युपीआय हे पैसा पाठविण्याचे आणि प्राप्त करण्याचे क्रांतिकारी पॅशलेस माध्यम आहे. भीम युपीआयचा उपयोग करुन फेब्रुवारीमध्ये तब्बल १ अब्ज ३२ कोटी ३२ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार केला आहे.

दरम्यान देशभरातील ग्राहकांनी भीम युपीआयला मोठ्या संख्येने दिलेली पसंती, साठ बँकांचा असलेला पाठिंबा, गुगल, फोन पे यांच्या ऍप्सकडून होणारा वापर आणि मोठय़ा संख्येने व्यापाऱ्यांनी या माध्यमाचा केलेला स्वीकार यामुळे भीम युपीआयद्वारे व्यवहारांमध्ये ही अफाट वाढ झाली आहे.

याचप्रमाणे भीम आणि अ‍ॅमेझॉन पे, फ्रीचार्ज, मोबिक्विक आणि व्हॉट्सअँप पे (सध्या निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध) यासारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सने यूपीआय इकोसिस्टममध्ये बाजारातील ५ टक्के वाटा आहे. भीम अँपने जानेवारी २०२० मध्ये १ कोटी ८५ लाख रुपयांचे व्यवहार केले. तर डिसेंबर २०१९ १ कोटी ७८ लाख एवढे व्यवहार झाले आहेत. त्या बदल्यात फेब्रुवारी मध्ये सर्वाधिक व्यवहार झाल्याचे दिसून येते.

भीम युपीआय हे ऍप ग्राहकांना देऊ करत असलेल्या जास्तीत जास्त सुविधांमुळे ते मोठय़ा प्रमाणावर लाखो ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे. भीम युपीआय हे मोबाईलद्वारे पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वरदान आहे. ते अत्यंत जलद, अखंड चालणारे आणि वापरण्यास अतिशय सोपे आहे.

अगदी छोट्या वस्तूपासून ते मोठ्या वस्तुपर्यंत कोणत्याही व्यवहारासाठी भीम अँप सोयीस्कर आहे. सध्याच्या पिढीला सर्व काही अतिशय वेगवान हवे असते आणि या ऍपमुळे किती तरी वेळ वाचतो. तुमच्या मोबाईलच्या संपर्काच्या यादीत असलेल्या आणि वैध युपीआय असलेल्या कुणालाही पैसे पाठवण्यासाठी भीम ऍप अत्यंत उपयुक्त आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!