Friday, April 26, 2024
Homeनगरमाणिकदौंडीत मरकसच्या कार्यक्रमातील व्यक्ती

माणिकदौंडीत मरकसच्या कार्यक्रमातील व्यक्ती

कुटुंबातील 12 जणांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी समाजाच्या मरकस कार्यक्रमाचे पाथर्डी कनेक्शन उघड झाले असून तालुक्यातील माणिकदौंडी येथे मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थीत असलेला व्यक्ती सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तालुका प्रशासनाने संबंधीत व्यक्तीसह त्याच्या कुटुंबातील 12 जणांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी शुक्रवारी दुपारी पाठवले असून तपासणी अहवालाकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी समाजाच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तीमुळे कोरोनाबाधितांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. देश विदेशातील अनेक लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर हे विविध राज्यांमध्ये गेले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तालुक्यातील माणिकदौंडी येथे मरकज कार्यक्रमात सहभागी झालेला एकजण आल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधीत व्यक्ती दिल्लीतील मरकज कार्यक्रमात सहभागी होऊन 13 मार्च रोजी मुंबईत आला होता. त्यानंतर लॉकडाऊन असतानाही संबंधीत व्यक्तीच्या भावाने माणिकदौंडी येथून पीकअप गाडी घेऊन वडाळा (मुंबई) येथे जात त्याला 26 मार्च रोजी माणिकदौंडी येथे आणले होते.त्यानंतर माणिकदौंडी गावात तो मरकजहून आल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.याबाबत तालुका प्रशासनाला गुप्त महितीदारामार्फत माहिती कळविण्यात आली.या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार पंकज नेवसे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, डॉ. शैलेश जायभाय यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी 108 रुग्णवाहिकेसह शुक्रवारी बाराच्या सुमारास माणिकदौंडी येथे दाखल झाले होते.

यावेळी संबंधीत अधिकार्‍यांनी चौकशी केली असता 35 वर्ष वयाच्या व्यक्तीने आपण मकरजहून मुंबई व मुंबईहून माणिकदौडीत आल्याचे कबुल केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी दिली.यानंतर प्रशासनाने संबंधीत व्यक्तीसह कुटुंबातील बारा जणांना 108 या रुग्णवाहिकेतून नगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यासाठी पाठविले आहे. याची माहिती तालुक्यात पसरताच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 48 तासांनंतर संबंधित व्यक्तींचा अहवाल येणार असून या अहवालाकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान सायंकाळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या आदेशानुसार माणिकदौंडी परिसर सील करण्याबाबत हालचाली चालू होत्या. या मरकस प्रकरणामुळे प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या