Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मजले चिंचोलीतील घोटाळा प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Share
‘अर्बन’बँक घोटाळाप्रकरणी खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका, Latest News Arban Bank Froud petition Ahmednagar

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तालुक्यातील मजले चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंचांच्या बोगस सह्या करून सुमारे 57 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 25) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जर्‍हाट असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच गीतांजली अविनाश आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आपण सन 2014 ते 2019 या कालावधीत मजले चिंचोली गावाच्या सरपंच होतो.

या काळात उपसरपंच असलेले धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जर्‍हाट यांनी खोट्या ग्रामसभा दाखवत बनावट ठराव तयार केले व त्यावर महिला सरपंचाची बनावट सही व शिक्के मारुन मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामात तब्बल 57 लाख 15 हजार 417 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला. या बाबत आपण सरपंच असतानाही आपणास तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनाही अंधारात ठेवण्यात आले. या बनवाबनवीत दोघांनी जिल्हा परिषद प्रशासन व राज्य शासनाचीही फसवणूक केली आहे.

तत्कालीन सरपंच गीतांजली आव्हाड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी धर्मनाथ आव्हाड व श्रीकांत जर्‍हाट यांच्या विरुद्ध भादंवी कलम 193, 196, 199, 200, 468, 469, 471, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

वर्षभराच्या लढ्यानंतर यश
मजलेचिंचोली ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत जर्‍हाट यांनी केलेल्या आर्थिक ग़ैरव्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर वर्षभरापासून गीतांजली आव्हाड गुन्हा दाखल व्हावा यासाठी पाठपुरावा करत होत्या. जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही त्यांनी दखल घेतली नाही. एमआयडीसी पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर आव्हाड यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितल्यानंतर जिल्हा न्यायाधीश शबनम शेख यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!