Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

कोरोना बाधित सर्वाधिक महाराष्ट्रात

Share
श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह, Latest News Shrigonda Corona Infected Patient Report

देशभरातील आकडा 90 पेक्षा अधिक

मुंबई : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायसरचा पाय पसरायला हळूहळू सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाबत चिंतामुक्त असलेल्या भारतीयांची चिंता आता वाढला आहे. देशभरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 26 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर केरळमध्ये 19 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.शनिवारी सध्याकाळी 4 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 90 रुग्ण देशभरात आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 26 रुग्ण आढळून आले असून पुणे येथे 10, मुंबई 5, रायगड 1, कल्याण 1, अहमदनगर 1, नागपूर 4, ठाणे 1, यवतमाळ 2, कल्याण 1 रुग्ण आढळून आले आहेत.

देशात दोन बळी
भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. शुक्रवारी दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!