Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रचिखलदरा : गाडगेबाबा रोटी अभियान अंतर्गत गरजूंना दोन रुपयांत जेवण; आमदार बच्चू...

चिखलदरा : गाडगेबाबा रोटी अभियान अंतर्गत गरजूंना दोन रुपयांत जेवण; आमदार बच्चू कडू यांचा अनोखा उपक्रम

मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चिखलदरा येथे १६ एप्रिलपासून संत गाडगे बाबा रोटी अभियानाअंतर्गत ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये गोरगरिंबासाठी अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसच्या लॉक डाऊन काळात अनेक राजकीय मंडळींनी पुढाकार घेऊन गोरगरिबांसाठी सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी हा रोटी अभियान सुरू करण्यात आला आहे. चिखलदरा स्टॉप रेस्ट हाऊस परतवाडा या ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला आहे. येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत जेवण उपलब्ध असते. दररोज किमान आठशे लोक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.

दरम्यान, राज्यात सुरू असलेली शिवभोजन थाळी देखील आता केवळ ५ रुपयांना मिळते आहे. तसेच प्रतिदिन शिवभोजन थाळ्यांची उपलब्ध संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या