Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रसातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

सातारा : सातारा शहरात अखेर कोरोनाने शिरकाव केला असून कॅलिफोर्निया वरून आलेल्या एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान शहरातील कोरोनाचा हा पहिलाच बळी आहे. महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तीची प्राथमिक चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. मात्र, १४ दिवसाच्या उपचारानंतर करण्यात आलेल्या चाचणीत या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तरीही त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

- Advertisement -

तत्पूर्वी शहरातील जिल्हा रुग्णालयात दोन पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील एकजण कॅलिफोर्नियाहून आलेला होता. या दोघांचे प्राथमिक अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र, त्यानंतर या दोन्ही रुग्णांचे १४ दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.

आज या दोन्ही रुग्णांचे १५ व्या दिवसांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार होते. परंतु, त्या आधीच या ६३ वर्षीय रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला.

दरम्यान, या व्यक्तीचे प्राथमिक रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्याच्या शेजाऱ्यांनाही क्वॉरंटाइन करण्यात आले होते. तसेच कॅलिफोर्नियाहून आल्यानंतर तो ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला होता, त्या सर्वांचा शोध घेण्यात येत असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या