Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई : बाबासाहेबांनी विषमतेविरूद्ध लढा दिला, आपल्याला विषाणु विरूद्ध लढा द्यायचाय :...

मुंबई : बाबासाहेबांनी विषमतेविरूद्ध लढा दिला, आपल्याला विषाणु विरूद्ध लढा द्यायचाय : मुख्यमंत्री

मुंबई : बाबासाहेबांनी विषमतेविरूद्ध लढा दिला, आता आपल्याला विषाणु विरूद्ध लढा द्यायचा असल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ते फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. त्यांनी आजच्या संवादाची सुरुवात भीम सैनिकांचे आभार मानून केली. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, मात्र सर्व भीमसैनिकांनी अत्यंत शिस्तीत, गर्दी न करता या महापुरुषाला मानवंदना दिली त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की राज्यावर बिकट परिस्थिती उद्भवली असताना राज्यातील जनता घरी थांबून कोरोनाशी लढा देत आहे.

- Advertisement -

सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण असले तरी सर्वाधिक कोरोना चाचण्या देखील महाराष्ट्रात होत आहेत. यासाठी डॉक्टरांची एक टास्क फोर्स तयार करणयात आली आहे. यामध्ये राज्यातील अनेक नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच कोरोनाचा बिमोड आपण करणार आहोत, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे डे टू डे राज्यातील अपडेट मिळणार आहे. तसेच सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यावर ही कमिटी वॉच ठेऊन असणार आहे. याबाबतची बैठक नुकतीच पार पडली आहे.

तसेच कोरोनाच्या संकटानंतर राज्यावर आर्थिक संकट कोसळणार आहे. याबाबत राज्यातील दिग्गज अर्थ तज्ज्ञाची एक टास्क फोर्स उभारण्यात येत आहे. याद्वारे राज्यवारील आर्थिक संकट कसे दूर करता येईल, याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. कारण कोरोनानंतर आर्थिक संकटाचा सामना करणं सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच मुख्यमंत्री पुढं म्हणाले की कृषीविषयक नियोजन महत्वाचे आहे. कारण बळीराजा हा त्याच्या घामावर सगळे देश चालतो आहे. त्यांच्या संदर्भातही योग्य नियोजन करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या