Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकरी रस्त्यावर

Share
नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकरी रस्त्यावर, Latest News Loss Panchanama Farmer Movement Ahmednagar

खडकीत संत्रा रस्त्यावर फेकून आंदोलन

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तालुक्यातील काही भागात रविवारी रात्री वादळी वारा आणि अवकाळी गारपिटीचा तडाखा बसला. त्यात खडकी परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. मात्र, सोमवारी कोणताही प्रशासकीय अधिकारी नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी मंगळवारी सकाळी वादळी वार्‍याने गळलेला संत्रा रस्त्यावर फेकून आंदोलन केले आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

नगर तालुक्यातील खडकी परिसराला संत्रा फळबागांचे आगर मानले जाते. खडकी, बाबूर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, सारोळा कासार या भागात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळबाग आहेत. खडकी परिसरात 500 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबाग आहे.रविवारी रात्री 8 च्या सुमारास या भागात मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचा वारा सुटला.पाऊस तुरळक असला तरी वारा जोराचा होता. त्यात तोडणीला आलेल्या फळबागांचे फळे गळाल्याने मोठे नुकसान झाले.

सोमवारी माहिती होऊनही कोणताही प्रशासकीय अधिकारी या भागात पाहण्यासाठी फिरकला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी मंगळवारी सकाळीच गाळलेल्या फळांसह नगर-दौड रस्त्यावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, राहुल बहिरट, ग्रामपंचायत सदस्य महेश कोठुलळे, उपसरपंच रोकडे, केतन निकम, ऋषी कोठुळे, राहुल कोठुळे, अशोक कोठुळे, अमृत कोठुळे, नवनाथ कोठुळे, रतन बहिरट, अर्जुन रोकडे, आदिनाथ गायकवाड, प्रवीण कोठुळे, सुनील कोठुळे, भाऊसाहेब खेंगट यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

जिल्हा परिषदे सदस्य कार्ले, हराळ यांनी शेतकर्‍यांची समजूत काढली. सरकार आपले आहे, या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे प्रशासनास करण्यास सांगू असे सांगत आंदोलन न करण्याची विनंती केली. शेतकर्‍यांनीही आंदोलन मागे घेत फळे रस्त्यावर फेकून प्रशासकीय धोरणांचा निषेध केला. तातडीने पंचनामे करत हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

आम्ही शेतकर्‍यांसोबत
अवकाळी पावसाच्या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत.नगर तालुका प्रशासन त्यात चालढकल करू शकत नाही. त्यांना मी पंचनाम्याच्या सूचना देणार आहे. बुधवारी दुपारनंतर प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागास भेट देऊ.
– आमदार निलेश लंके

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!