दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरीची गरज

0
Cricket - England v India - First Test - Edgbaston, Birmingham, Britain - August 2, 2018 India's Virat Kohli salutes the fans as he walks off the pitch after losing his wicket Action Images via Reuters/Andrew Boyers

लॉर्डस : भारत वि इंग्लंड यांच्यात सध्या ५ कसोटी सामन्याची मालिका सुरु आहे. या मालिकेत इंग्लंड सध्या १-० ने आघाडीवर आहे. भारतीय गोलंदाजांनी गोलंदाजीत केलेली कमाई फलंदाजांनी उधळून टाकली. दुसरा कसोटी सामना गुरुवारी होत असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजेपासून सुरु होईल.

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात २०१४ साली भारतीय संघ लॉर्ड्स कसोटीत इशांत शर्माच्या भेदक माऱ्यामुळे विजयी ठरला होता मात्र पहिला कसोटी सामना अनिर्णित झाल्यानंतर २०१४ मध्ये दुसऱ्या कसोटीत लॉर्डस मध्ये भारत विजयी झाला पण पुढील तीनही लढतीत भारताचा पराभव झाला. व मालिका गमवावी लागली.

यंदाही भारतीय संघाला सलामी कसोटीत १९४ धावांचे लक्ष पार करण्यात अपयश आले. भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. सलामीला धवन ऐवजी राहुल आवि विजय तर नंबर ३ ला पुजारराला स्थान दिले जाऊ शकते. भारतासाठी जमेची बाजू विराट चांगला फॉर्मात आहे. तर उर्वरित फलंदाजी कडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

तर दुसरीकडे यजमान इंग्लंड दुसरा विजय नोंदवण्यासाठी सज्ज आहे. कर्णधार जो रुटने अर्धशतक झळकावून आपण फॉर्मात असल्याचे स्पष्ट केले तर युवा डावखुरा लेफ्ट आर्म गोलंदाज सॅम कुरण आपल्या अष्टपैलू कामगिरीची छाप पडली होती. तर बेन स्टोक्स याने चार बळी घेत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

भारताच्या संभाव्य संघ :  लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे, विराट कोहली ( कर्णधार), दिनेश कार्तिक (Wk ) हार्दिक पंड्या, आर. अश्विन, उमेश यादव, इशांत शर्मा, मो. शर्मा

इंग्लंड संघ : कुक, जो रूट जॉनी बेरिस्टो, डेव्हिड मुलं, आदिल रशीद, क्रिस वोक्स, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, सॅम कुरण, जोस बटलर, बेन स्ट्रोक्सला विश्रांती दिली जाऊ शकते. पीटर जेनिंग्स.

(संकलन : सलील परांजपे )

LEAVE A REPLY

*