सांगा.. आम्ही जगायचे तरी कसे ?

jalgaon-digital
2 Min Read

लॉकडाऊनमध्ये टपरीचालक, पंक्चरवाला, लाँड्रीवाल्यांची उपासमार

अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. दिवसभर काबाडकष्ट करून मिळालेल्या कमाईतून कौटुंबिक खर्च भागविणार्‍या अनेकांना खर्चाशी हातमिळवणी करताना नाकीनऊ येत आहेत. टपरीचालक, पंक्चरवाले, खादपदार्थ विक्रेते, लाँड्री व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पदरी पैसाच नसल्याने ‘सांगा आम्ही जगायचे तरी कसे’, असा चिंतातूर सवाल ते करीत आहेत.

नगर शहरातील सावेडी नाका, भिस्तबाग चौक, प्रॉफेसर कॉलनी चौक, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, कापडबाजर, जिपोओ चौक, केडगाव, भिगार आदी भागत हातगाडीवर खादपदार्थ विकणारे, सलून पार्लर चालक, लाँड्रीधारक, पंक्चर दुकानदार, पानटपरीधारक आदींची दुकाने आहे. या सुमारे 3 ते 4 हजार कुटुंब या व्यवसायवर अवलंबून आहेत. हातावर पोट असलेली ही मंडळी परेशान झाले आहेत. भाजीपाला विक्रेते, जीवनावस्यक वस्तू विक्रेते यांना सुट असल्यामुळे त्यांचा रोजगार नियमित सुरू आहे.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन जारी करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल आहे. घरात बचत करून ठेवल्या काही रक्कमेवर उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र ती बचत केलेली रक्कम देखील संपली आहे. हा लॉकडाऊन असाच वाढत राहिल्यास आणखी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
काही छोट्या व्यवसायिकांशी चर्चा केली असता त्यांनी भावनिक होत प्रतिक्रिया दिल्या. मी नाष्ट्याची गाडी चालवितो. गेल्या महिन्यापासून हातगाडी बंद आहे. उदरनिर्वाहाचे साधनच बंद झाले आहे. आतातरी काही दिवसांसाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून आम्हाला व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ते करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *