Friday, April 26, 2024
Homeनगरलॉकडाऊनमध्येही साईबाबांच्या झोळीत 1 कोटीचे दान

लॉकडाऊनमध्येही साईबाबांच्या झोळीत 1 कोटीचे दान

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या झोळीत देश लॉकडाऊन असताना मात्र दान सुरुच असून देश विदेशातील भाविकांनी एक कोटी रुपयांचे आँनलाईन दान जमा केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारत सरकार व राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले असून 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असतानाही 3 एप्रिलपर्यंत साई भक्तांकडून ऑनलाईनव्दारे 1 कोटी 90 हजार 201 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी डोंगरे म्हणाले की देश व राज्यावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होऊ नये म्हणून भारत सरकार व राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले असून संस्थानच्या वतीने 17 मार्च पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. साईबाबांचा महिमा व त्यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचलेली आहे. साईबाबांचे भक्तगण देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. साईसमाधी मंदिर बंद कालावधीत टाटा स्कॉय, संस्थान संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅप्सव्दारे थेट ऑनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहे.

साईबाबांचे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असले तरी देखील भावीकांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरु ठेवली असून 17 मार्च ते 3 एप्रिल 2020 याकालावधीत साईभक्तांकडून ऑनलाईनव्दारे 1 कोटी 90 हजार 201 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे. यामध्ये 17 मार्च 4 लाख 04 हजार 825 रुपये, 18 मार्च 3 लाख 14 हजार 727 रुपये, 19 मार्च 8 लाख 30 हजार 238 रुपये, 20 मार्च 2 लाख 39 हजार 505 रुपये, 21 मार्च 3 लाख 91 हजार 963 रुपये, 22 मार्च 3 लाख 61 हजार 406 रुपये, 23 मार्च 4 लाख 97 हजार 345 रुपये, 24 मार्च 3 लाख 3 हजार 37 रुपये, 25 मार्च 5 लाख 35 हजार 592 रुपये, 26 मार्च 6 लाख 59 हजार 271 रुपये, 27 मार्च 6 लाख 79 हजार 330 रुपये, 28 मार्च 5 लाख 7 हजार 391 रुपये, 29 मार्च 4 लाख 80 हजार 313 रुपये, 30 मार्च 4 लाख 50 हजार 150 रुपये, 31 मार्च 13 लाख 17 हजार 213 रुपये, 1 एप्रिल 5 लाख 74 हजार 199 रुपये, 2 एप्रिल 12 लाख 56 हजार 234 रुपये व 3 एप्रिल 2 लाख 84 हजार 462 रुपये अशी एकुण 18 दिवस देणगी प्राप्त झाली असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या