Friday, April 26, 2024
Homeनगरलॉकडाऊऩ काळात एलसीबीकडून 39 जणांवर गुन्हे

लॉकडाऊऩ काळात एलसीबीकडून 39 जणांवर गुन्हे

29 ठिकाणी टाकले छापे : 34 लाखांचा ऐवज जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 29 ठिकाणी छापे टाकून 39 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या छाप्यात देशी-विदेशी दारू, रोख रक्कम, मटका जुगार साहित्य, गावठी दारू, वाळू वाहने, सुगंधी तंबाखू, गुटखा असा 32 लाख 96 हजार 628 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

करोना संसर्ग फैलाव होऊ नये म्हणून गेल्या दोन अडीच महिन्यांपासून पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. या काळात सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली असताना काही व्यक्तींनी आपले अवैध धंदे जोरात सुरू ठेवले. जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या.

पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अवैध धंदे विरोधात कारवाईची विशेष मोहीम राबविली. यामध्ये अवैध मार्गाने विक्री होणारी देशी-विदेशी दारू, मटका- जुगार खेळणारे, घातक रसायनापासून तयार होणारी गावठी दारू, वाळू उपसा करून वाहतूक करणारी वाहने, गोमांस विक्री करणारे, प्रतिबंधित मावा व गुटखा यांची विक्री करणार्‍या 29 ठिकाणी छापे टाकून 39 जणांविरुद्ध भारतीय दंड सहिता, पर्यावरण संरक्षण कायदा, प्राणी संरक्षण कायदा, महाराष्ट्र दारू बंदी कायदा आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामधून 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर अधीक्षक डॉ. सागर पाटील, अपर अधीक्षक (श्रीरामपूर) डॉ. दिपाली काळे-कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या