Thursday, April 25, 2024
Homeनगरलॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू, शेतीउद्योग अन् औद्योगिक प्रकल्प सुरू

लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू, शेतीउद्योग अन् औद्योगिक प्रकल्प सुरू

जिल्हाधिकारी : जिल्हा प्रशासनाच्या लेखी पूर्वपरवानगीची गरज नाही

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन काळात ज्या उद्योग आणि औद्योगिक प्रकल्पांना ते सुरू करण्याबाबत सवलत दिली आहे, अशा औद्योगिक प्रकल्प-उद्योगांना उत्पादन चालु करण्यासाठी किंवा उत्पादन क्रिया चालू ठेवण्यासाठी कोणत्याही लेखी पूर्वपरवानगीची आवश्यकता नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यात विविध जीवनावश्यक वस्तु शेतीशी निगडित उत्पादनांचा समावेश आहे.

- Advertisement -

या आदेशानुसार, जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तुंचे उत्पादन करणारे प्रकल्प ज्यात अन्न व संबंधित वस्तू, साखर, दुग्धशाळा, पशुखाद्य आणि चारा युनिट, फार्मास्युटिकल्स उत्पादन आणि त्यांचा व्यापार करणारे व्यापारी आणि त्यांची वाहतूक, लस, सॅनिटायझर्स, साबण आणि डिटर्जंट्स, मास्क, यांचे उत्पादन आणि वितरण करण्यात गुंतलेले लोक यासह जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनांचे युनिट वैद्यकीय उपकरणे, त्यांची उपकरणे व सहाय्यक सेवा आदींचा समावेश आहे.

तसेच, ज्यांना सतत प्रक्रियेची आवश्यकता असते असे उत्पादन प्रकल्प यांचाही यात समावेश आहे. शेती उत्पादनांशी संबंधित प्रक्रिया, पॅकेजिंग व वाहतूक. खते, कीटकनाशके व बियाण्याचे उत्पादन व पॅकेजिंग युनिट आदींचाही यात समावेश असणार आहे. कोळसा आणि खनिज उत्पादन, वाहतूक, स्फोटकांचा पुरवठा आणि खाणकामांशी संबंधित प्रक्रीया. खाद्यपदार्थ, ड्रग्ज, फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय उपकरणांसाठी पॅकेजिंग मटेरियलचे उत्पादन करणारे प्रकल्प अथवा उद्योग. गव्हाचे पीठ, कडधान्य आणि खाद्यतेल इत्यादीसारख्या अत्यावश्यक उपक्रमांच्या निर्मितीमध्ये गुंतलेली सुक्ष्म, मध्यम व लघु उद्योग यांनाही कोणत्याही लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक परवानगीची गरज असणार नाही, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या