Saturday, May 11, 2024
Homeनगरमनमाड रस्त्यावरील हॉटेलवाले तळीरामांसाठी करतात ‘सोयपाणी’

मनमाड रस्त्यावरील हॉटेलवाले तळीरामांसाठी करतात ‘सोयपाणी’

अहमदनगर (प्रतिनिधी) – गाव लॉकडाऊन झालं, पण हद्दीतील मनमाड हायवेवरील हॉटेलवाल्यांन ‘सोयपाणी’ केल्याने गाव तर्राटांच्या वागण्याला वैतागले आहे. सांगूनही हॉटेलवाले ऐकत नसल्याने सरपंचांच्या मिस्टरांनी थेट कारवाईसाठी प्रशासनालाच साकडे घातले आहे.

कोरोनाच्या भितीने गावची गाव लॉक डाऊन झाले आहेत. माणसंही घराबाहेर निघत नाही. सरपंच व सदस्यांनी गाव लॉकडाऊन करत संचारबंदीही केली आहे. सरपंचांच्या आदेशाला डावलत गावात तळीरामांचा राबता मात्र सर्वत्र सुरू आहे. बंदीच्या काळात मदीरा मिळते अन् संचारबंदीच्या नियमालाही हरताळ. सरपंचांचे कंट्रोल नाही, असा आरोप गावकरी करू लागले आहे. त्याला कारणही तसेच. मनमाड हायवेकडेला वसलेले नांदगाव परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. या हॉटेलमधून सर्रासपणे चढ्या भावाने दारू विक्री केली जात आहे. सामान्य लोकांना परवडणारी देशी थेट दोनशे रुपयांना विकली जात आहे. सरपंचांनी सांगितले तरीही हे हॉटेलवाले ऐकत नाही. आता प्रशासनानेच चोरी छुपके सुरू असलेली दारू विक्री थांबावी अशी मागणी सखाराम सरक यांनी केली आहे. .

- Advertisement -

हायेवकडेला असलेल्या हॉटेलमध्ये राजरोसपणे चढ्या भावाने दारू विक्री सुरू आहे. देशीची बाटली दीडशे ते दोनशे रुपयांना विकली जात आहे. नांदगाव, विळद , देहरे गावातील तरुण, तळीराम नशेसाठी येथे येतात. लॉकडाऊनवर त्याचा परिणाम होत आहे. पोलिसांनीच आता या हॉटेलवाल्यांवर कारवाई करावी.
– सखाराम सरक, नांदगाव.

- Advertisment -

ताज्या बातम्या