Friday, April 26, 2024
Homeनगरलॉकडाऊनच्या दोन महिन्यानंतर अकोल्यात करोनाचा शिरकाव

लॉकडाऊनच्या दोन महिन्यानंतर अकोल्यात करोनाचा शिरकाव

अकोले (प्रतिनिधी)- लॉकडाउनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रशासनाचे अथक प्रयत्न व जनतेची जागृकता यामुळे करोनाच्या प्रदूर्भावापासून मुक्त असलेल्या निसर्गरम्य अकोले तालुक्यात अखेर करोना विषाणूने प्रवेश केला आहे. मुंबई येथून लिंगदेव या आपल्या मुळ गावी आलेल्या एका शिक्षकाला करोनाची बाधा झाली आहे. अकोले तालुक्यातील करोनाचा हा पहिलाच रुग्ण, अर्थात तो करोना बाधित असल्याचा खाजगी प्रयोग शाळेचा अहवाल असल्यामुळे त्याच्या सरकारी प्रयोग शाळेतील तपासणीची तालुक्याला प्रतीक्षा आहे. दरम्यान हा रुग्ण आणि त्याचा मुलगा व अन्य नऊ जणांना तपासणीसाठी नगर येथे नेण्यात आहे.

अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे मुबंईच्या घाटकोपर येथून मुळ लिंगदेवचे असणारे शिक्षक (वय 56) व त्यांचा मुलगा (वय 15) असे दोघे जण दि. 13 मे 2020 रोजी गावी आले. त्यांना आरोग्य विभागाने लिंगदेव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विलगिकरण कक्षात क्वांऱटाईन करण्यात आले होते. तर त्यांची क्वांऱटाईनची मुदत संपल्याने तसेच त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे त्यांना घरी जाऊ देण्यात आले. मात्र त्या नंतर घसा खवखवत असल्यामुळे स्थानिक डॉक्टरांच्या सल्यानुसार संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयामार्फत त्यांची शुक्रवारी तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

त्याचे स्वब तपासणीसाठी एक खाजगी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल शनिवारी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात एकाच खळबळ उडाली. करोनाचा प्रादुर्भाव अकोले तालुक्यात झाल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. मग तहसीलदार मुुुुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी इंंद्रजीत गंभीरे, आरोग्य यंंत्रणा लिंगदेवमध्येे पोहचली. माळवाडी शाळेत क्वारंटाईन केलेल्याची चौकशी करुन संबंधित 56 वर्षीय शिक्षक व त्याचे मुलाला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

शासकीय प्रयोग शाळेत त्याच्या स्वबची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर तो करोना बाधित आहे की नाही यावर शिक्का मोर्तब होईल. दरम्यान या दोघा बाप लोकांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या 9 जणांना तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे. खबर दारीचा उपाय म्हणून लिंगदेव येथील फापाळे वस्ती पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आली आहे.

सदर रुग्ण व त्याचा मुलगा 12 मे रोजी मोटार सायकल वर घाटकोपर येथील भटवाडी येथून लिंगदेव येथे आले होते.त्यांची पत्नी ही यापूर्वीच लिंगदेव आली होती. पहिले दोन दिवस बाप लेक घरी गेले. नंतर स्थानिक करोना समिती व त्यांच्यात वाद झाल्याचे समजते. अकोले तालुक्यात मुंबई परिसरातून गावी येत असणार्‍याचे प्रमाण वाढत आहे. गावकरी योग्य ती खबरदारी घेत असले तरी गावी आलेले अनेक जण ग्राम सुरक्षा समितीला जुमानत नाहीत. अशांवर कडक कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.

रुग्णांच्या निकट संपर्कात आलेले 9 असे 11 लोक नगरला तपासणीसाठी पाठविले आहेत. लिंगदेवची फापाळेवस्ती लॉकडाऊन करण्यात आली. सध्या लिंगदेव येथील माळवाडीच्या शाळेत बाहेरून आलेले 30 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
– मुकेश कांबळे ,तहसीलदार अकोले

अकोले तालुक्यातील लिंगदेव मधील 56 वर्षीय रुग्णांचा करोना बाबतचा खाजगी हॉस्पिटलचा रिपोट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु लिंंगदेवमधील दोघांना करोना तपासणीसाठी नगर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले असून सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट आल्यावरच करोना बाबतीत निदान स्पष्ट होईल.
– डॉ. इंंद्रजित गंभीरे तालुका आरोग्य अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या