Thursday, April 25, 2024
Homeनगरखर्डा येथे संमेलनास राज्यातील 20 जिल्ह्यांतील साहित्यिकांची उपस्थिती

खर्डा येथे संमेलनास राज्यातील 20 जिल्ह्यांतील साहित्यिकांची उपस्थिती

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेडच्या वतीने खर्डा येथे दोन दिवसांचे महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. या संमेलनास राज्यातील 20 जिल्ह्यांतील साहित्यिकांनी उपस्थिती लावली होती.

सोमवार 27 रोजी रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत भव्य ग्रंथदिंडी खर्डा गावातून काढण्यात आली. खर्डा व तेलंगशी येथील शैक्षणिक संस्थांनी लेझीम, टिपणी, टाळमृदंग व झांज पथकासह दिंडीत सहभाग घेतला. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, यवतमाळचे कवी विनय मिरासे, कवयित्री नीलम मानावे, हनुमंत चांदगुडे, कथालेखक भास्कर बडे, प्रा. यशवंत माळी, इंद्रकुमार झांजे, डॉ. मधुकर क्षीरसागर, चित्रपट गीत लेखक बाबासाहेब सौदागर, बीडचे कवी अनिल होळकर, चंद्रपूरचे कवी प्रदीप देशमुख, डॉ. राजाराम सोनटक्के, डॉ. अशोक शिंदे, प्रसिद्ध लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले (अमरावती) गायिका मीनाक्षी होळकर, अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक डॉ. सदानंद देशमुख, प्राचार्य गोविंद गायकी आदींसह प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आ. य. पवार, स्वागताध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, डॉ. विद्या काशिद, शोभाताई काशिद, गुलाबराव जांभळे, सरपंच संजय गोपाळघरे, विजयसिंह गोलेकर, प्रकाश दिंडोरे, दत्तराज पवार, संतोष थोरात व व्यापार्‍यांनी दिंडीत उत्साहाने सहभाग घेतला होता.

- Advertisement -

बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. इंद्रकुमार झांजे, अनिल होळकर, रमेश शिंदे व बाबासाहेब सौदागर यांच्या कवितांना श्रोत्यांनी दाद दिली. हनुमंत चांदगुडे, सदानंद देशमुख, मीनाक्षी होळकर, मेघा पाटील, मालती सेमले, विनय मिरासे, संजय बोरुडे आदी मान्यवर कवींसह 14 कवींनी सहभाग घेतल्याने उत्तरोतर कविसंमेलन रंगत गेले.

त्यानंतर विदर्भातील प्रसिद्ध लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन झाले. डॉ. भास्कर बडे (लातूर) प्रा. संभाजीराव गायकवाड (सांगली) विलास सिंदगीकर (लातूर), विनय मिरासे (यवतमाळ) आदी लेखकांनी कथाकथनात सहभाग घेतला. सरपंच संजय गोपाळघरे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाला. संस्थेचे वतीने प्रा. शत्रुघ्न कदम यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या