Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बिबट्या जेरबंद

Share

देवळाली कॅम्प । वार्ताहर

येथील धोंडी रोडवरील पॉवर हाऊसजवळ लष्करी भागात लावलेल्या पिंजर्‍यात शनिवारी सायंकाळी बिबट्या जेरबंद झाला. याबाबतची माहिती तेथील अधिकार्‍यांनी वनविभागाला काळवल्यानंतर काही वेळातच वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, गोविंद पंढरे यांनी घटनास्थळी येऊन पिंजरा ताब्यात घेतला.

त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. आज बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याचे समजताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सदरचा बिबट्या नर जातीच्या असून 3 वर्षे वयाच्या असल्याचे वन अधिकार्‍यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!