Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भूसंपादनाची पैसे मिळेपर्यंत प्रकल्प होऊ देणार नाही

Share
भूसंपादनाची पैसे मिळेपर्यंत प्रकल्प होऊ देणार नाही, Latest News Land Money Project Mp Vikhe Meeting Ahmednagar

खा. डॉ. विखे : बायवळण रस्त्याच्या प्रकल्प बाधितांच्या भूसंपादन तक्रार निवारणार्थ बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरासाठी व जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रकल्प पूर्णत्व करण्याची गरजेचे आहे. मात्र, त्याचबरोबर प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन व भरपाई मिळाल्याशिवाय या प्रकल्पांचे भूसंपादन होऊ देणार नाही, असे प्रतिपादन खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

अरणगाव, केडगाव नेप्ती येथील बायवळण रस्त्याच्या प्रकल्प बाधितांच्या भूसंपादन तक्रार निवारणार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते.त्याचबरोबर नेप्ती नगर-अरणगाव व केडगाव येथील भूसंपादनाचे या रकमा ताबडतोब शेतकर्‍यांपर्यंत पोचवून 31 जानेवारीपर्यंत दिलासा देण्याचे काम करावी, असे निर्देश त्यांनी दिले. याप्रसंगी प्रांताधिकारी भूसंपादन समन्वय अधिकारी काम नसेल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी व प्रकल्पबाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगर बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनबाबत प्रकल्प बाधित शेतकरी व प्रशासनाची समन्वय बैठक नगर येथे पार पडली. विखे यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अरणगाव शेतकर्‍यांनी जमीन संपादनाचा पूर्ण मोबदला मिळाला नसल्याचे तसेच भूसंपादन प्रक्रियेतील अनियमितेकडे खा. विखे पाटील यांचे लक्ष वेधले. त्यावर डॉ. विखे पाटील यांनी सर्व बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनाच्या आढावा घेतला.

ज्या शेतकर्‍यांना मोबदला मान्य असेल व कायदेशीर पूर्तता केली, असल्यास अशा शेतकर्‍यांना लाभापासून वंचित ठेवण्याची कुठलेही कारण नसल्याचे अधिकार्‍यांना सुनावले. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे तक्रारी केस बाय केस बेसवर ऐकण्याची निर्णय घेण्यात आला.अरणगाव, केडगाव येथील बाह्यवळण रस्त्याच्या संदर्भात काही अडचणी आहेत त्यांचे निवारण 31जानेवारीपर्यंत करण्याच्या सुचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!