Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

कुकाण्यात डबल ट्रॉली ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरखाली युवकाचा मृत्यू

Share
भरधाव वेगात असलेल्या ऊस वाहतूकीच्या रिकाम्या ट्रॅक्टर-ट्रॉली खाली सापडून विद्यार्थी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी नेवासे-शेवगाव रस्त्यावर कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडली. दरम्यान या अपघातानंतर संतप्त कुकाणे व तरवडी ग्रामस्थांनी येथील तरवडी चौकात सार्वजनिक बांधकाम व प्रादेशिक परिवहन विभागविरोधात तब्बल एक तास रास्तारोको आंदोलन केले.

नेवासा-शेवगाव राज्यमार्गावर कुकाणा व तरवडीच्या संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

कुकाणा (वार्ताहर) – भरधाव वेगात असलेल्या ऊस वाहतूकीच्या रिकाम्या ट्रॅक्टर-ट्रॉली खाली सापडून विद्यार्थी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी नेवासे-शेवगाव रस्त्यावर कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडली. दरम्यान या अपघातानंतर संतप्त कुकाणे व तरवडी ग्रामस्थांनी येथील तरवडी चौकात सार्वजनिक बांधकाम व प्रादेशिक परिवहन विभागविरोधात तब्बल एक तास रास्तारोको आंदोलन केले.

रोहित अशोक पुंड (वय 19) रा. तरवडी, ता. नेवासा असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शेवगावच्या दिशेने एकामागे एक असे दोन ऊसवाहतूक करणारे रिकामे ट्रॅक्टर-ट्रॉली जात असताना मयत रोहित मागच्या ट्रॅक्टर खाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान या अपघाताची घटना घडताच कुकाणा व तरवडी येथील संतप्त ग्रामस्थाथांनी डबल ट्रॅक्टर-ट्रॉली ऊस वाहातूक करणार्‍या वाहनांवर परिवहन विभागाने कारवाई करून अशी वाहातूक तात्काळ बंद करावी व रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वारंवार होणार्‍या अपघात प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करत रास्तारोको आंदोलन केले.

संतप्त आंदोलकांनी जोपर्यंत प्रादेशिक परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी जोपर्येंत येत नाही तोपर्येंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्णय घेतल्याने काही काळ येथील वातावरण तणावाचे झाले होते.

दरम्यान तहसीलदार रुपेश सुराणा व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या मध्यस्थी नंतर व तहसीलदार सुराणा यांनी संबंधित विभागाला पुन्हा सूचना देण्याच्या व डबल ट्रॅक्टर-ट्रॉली ऊसवाहतूक विरोधात परिवहन विभागाला तसेच तातडीने रस्त्याच्या दुरुस्ती साठी तातडीने संबंधीत विभागाला कार्यवाही करण्या बाबत सूचना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी भैय्यासाहेब देशमुख, भैरवनाथ भारस्कर, अभिजित लुनिया, अनिल गर्जे, राजेंद्र म्हस्के, तरवडीचे सरपंच भाऊसाहेब दरवडे, कुकाण्याचे माजी सरपंच एकनाथ कावरे, अशोक साबळे, राहुल जावळे, यांची भाषणे झाली. तहसीलदार रुपेश सुराणा व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

चौथा बळी! आणखी किती प्रतीक्षा ?
तालुक्यात दोन उसाचे कारखाने सुरू असल्यानेउसाची ट्रॅक्टर ची जोरात ऊस वाहतूक चालू आहे. रस्त्यावर विना नंबर तसेच अल्पवयीन ड्रायव्हर विना लायसन्स चे दोन ट्रॉली उसाची वाहतूक करतात. आधीच रस्त्यांची वाट लागलेली. त्यात अरुंद रस्ते असल्याने रस्त्याने वाहने चालवणे कठीण बनले आहे. तालुक्यातील देवगाव येथे एका ज्येष्ठ नागरिकाचा, बाभुळखेडा शिवारात एका बालिकेचा तर भानसहिवर्‍याजवळ एका तरुणाचा असे महिनाभरात आतापर्यंत तालुक्यात तीन बळी डबल ट्रॉली ट्रॅक्टरने घेतले. कुकाण्यातील बळी चौथा आहे. आणखी किती बळी घेतल्यावर सार्वजनिक बांधकाम रस्त्यांची दुरुस्ती करणार? तसेच उपप्रादेशिक़ परिवहन अधिकार्‍यांना जाग येणार? असा संतप्त सवाल सामान्य नागरिक करत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!