Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोतुळमध्ये आरती केल्याप्रकरणी 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

कोतुळमध्ये आरती केल्याप्रकरणी 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

अकोले (प्रतिनिधी)ः– देशभरात कोरोना विषाणूने प्रादुर्भाव वाढत असताना देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संचारबंदीचे आदेश असताना कोतुळ येथील गणेश मंदिरात विश्व हिंदू परिषदेचे तीन राज्याचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी मंदिरात आरती केली. त्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य 13 व्यक्तींविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शंकर गायकर (रा-ब्राह्मणवाडा, ता. अकोले, प्रदीप भाटे रा- कोतुळ, ता. अकोले, डॉ. निलेश काशिनाथ कडाळे, विजय वैद्य (पुजारी) पूर्ण नाव माहित नाही, 5) इतर सर्व एकूण 12 ते 13 ग्रामस्थ यांनी दिनांक 11/04/2020 रोजी 8.15 वाजेचे सुमारास गणेश मंदिर कोतुळ, ता अकोले यांनी सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोणा विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेश क्रमांक आव्यमपु/कार्या 19 अ /210/2020 दिनांक 19/3/2020 आदेशान्वये व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ते कलम 43 (1) भारतीय साथरोग अधिनियम 1897 व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे अधिसूचना कोरोना 2020/प्र, क्र, क्र. 58/ आरोग्य 5 दिनांक 14/3/2020 च्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव केल्यास कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

- Advertisement -

असे असताना देखील ब्राह्मणवाडा येथून सायंकाळी 4 वाजता घराचे बाहेर पडून ब्राह्मणवाडा येथील मित्रांना भेटून, त्यानंतर कोतूळ येथील कार्यकर्त्यांच्या दोन बैठका घेतल्या. तसेच दिनांक 11/04/2020 रोजी 8.15 वाजेचे सुमारास कोतुळ गणेश मंदिर येथे गणेश चतुर्थी असल्याने त्यांचे कोतूळ गावातील इतर 12 ते 13 ग्रामस्थ नाव पत्ता माहीत नाही. त्यांना बेकायदेशीर जमवून सर्वांनी आरती केली. सर्व समाजाच्या आरोग्याला व जीविताला धोका असलेल्या संसर्ग रोगाचा प्रसार होईल असे माहित असताना देखील कृत्य करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश नामदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 107/2020 भारतीय दंड संहिता 188, 269 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), (3)/135 साथीचा रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 2 व 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार सुनील साळवे हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या