Saturday, April 27, 2024
Homeनगरकोपरगावमध्ये सॅनिटायझरवरून आरोप-प्रत्यारोप

कोपरगावमध्ये सॅनिटायझरवरून आरोप-प्रत्यारोप

सॅनिटायझर वाटपाचे थोतांड करुन पालिकेला बदनाम करु नका – वहाडणे

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव शहरात सॅनिटायझर वाटप करण्याचे नाटकी थोतांड करून नगर पालिकेला बदनाम करु नका, तुम्ही करोनाच्या परिस्थितीत नगर पालिकेला एक रूपयांची देखील मदत केलेली नाही. शहरात औषध फवारणी केली त्याबद्दल तुमचे आभार, खालच्या पातळीचे राजकारण करून अशी टिका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोल्हे यांच्यावर केली आहे.

काल नगर परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल व कोल्हे गटाचे गटनेते रवींद्र पाठक यांनी कोपरगाव नगरपरिषदेवर आरोप करत कोल्हे कारखाना पालिकेस अल्पदरात सॅनिटायझर देत असताना पालिकेने त्यास प्रतिसाद न दिल्याचा आरोप केला. कोल्हे गटाच्या नेत्यांनीच आपण तालुक्यात नागरिकांना सॅनिटायझरच्या बाटल्या मोफत वाटणार असल्याच्या बातम्या पसरवल्या होत्या व त्यांनीच 15 एप्रिल रोजी पालिकेने या बाटल्या 20 रुपये किंमतीस खरेदी कराव्या असे पत्र दिले होते.

- Advertisement -

त्यावर उपनगराध्यक्ष योगेश बागुल व गटनेते रवींद्र पाठक यांच्या सह्या आहेत. शहर व तालुक्यात मोफत वाटण्याचे जे काम चालू आहे ते एक उत्तम प्रकारे वटवलेले नाटक आहे. एका ग्रामपंचायतीस हेच सॅनिटायझर थेट विक्री केल्याची पावतीच वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. सॅनिटायझर वाटपाचे निमित्त करून जो दानशूर पणाचा आव आणत आहे ते एक थोतांड असल्याचा आरोप वहाडणे यांनी केला आहे. याउलट आ. आशुतोष काळे यांनी नगरपरिषदेस पत्र देऊन आपण कोपरगाव शहरातील नागरिकांना मोफत सॅनिटायझर वाटप करणार असल्याचे कळवले आहे.

सॅनिटायझर वाटपाबाबत कोल्हेंनी कधीही राजकारण केले नाही – संधान

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कोल्हे कुटुंबाने काय केले हे सांगत नाही. स्वतःहुन कोपरगाव शहरावर व तालुक्यावर संकट येते तेव्हा सर्वात पहिले कोल्हे कुटुंब धावून येते व संकटात नागरिकांना मदत करण्यास सुरवात करते. आम्ही करोना बाबतीत केलेल्या मदतीचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व प्रसिद्धीत कधीही दिले नाहीत शहराची स्वच्छता व आरोग्य कर्मचार्‍याला मदत केली आहे. ग्रामीण भागात किट दिले आहे. 800 कुटुंबांना भाजीपाला व धान्य देत आहे. यात आम्ही राजकारण मध्ये आणले नाही, असेे मत भाजपचे पराग संधान यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोल्हे कुटुंबावर केलेल्या टिकेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत संधान बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय वाजे, कैलास जाधव, स्वप्नील निखाडे आदी उपस्थित होते.

यावेळी संधान म्हणाले की, 14 तारखेला संजीवनी व ग्रामपंचायतच्या विद्यमाने अल्पदरात सॅनिटायसर दिले. तसेच नगर पालिकेकडून निर्णय न आल्याने संपूर्ण शहाराला गुरुवार पासून 100 टक्के मोफत वाटप देखील सुरू केलेली आहे. त्यावर आम्ही कोणतेही राजकारण केले नाही, असेही संधान म्हणाले.

यावेळी कैलास जाधव म्हणाले, आता राजकारण करणे चुकीचे आहे. जे देत आहेत त्यांचे आभार मानायचे, आपल्या खिशातून आपण एक रुपया दिलेला नाही.याबाबत राजकारण करून दिशाभूल करू नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या