Monday, April 29, 2024
Homeनगरकोपरगावातील 17 पैकी 10 अहवाल निगेटिव्ह

कोपरगावातील 17 पैकी 10 अहवाल निगेटिव्ह

सात अहवाल अद्याप येणे बाकी

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या लक्ष्मीनगर येथील 60 वर्षीय महिलेला शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची लागण आढळल्या नंतर त्या भागातील या रुग्णांशी संपर्कात आलेल्या 17 जणांना आरोग्य विभागाने आपल्या ताब्यात घेऊन त्यांना तपासणीसाठी नगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते. त्यांच्या स्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते त्यातील 10 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले असून उर्वरित 7 अहवालाची प्रतिक्षा असल्याची माहिती कोपरगाव येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली आहे.

- Advertisement -

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात एक साठ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्याने तालुका प्रशासन आता खडबडून जागे होते. त्यांनी त्या रात्रीच लक्ष्मीनगर व संलग्न साईनगर व धारणगाव रस्त्यानजिकचा परिसर सील केला होता. या रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहाजण व त्या कुटुंबाच्या संलग्न मित्र, रिक्षाचालक, त्याची पत्नी, त्याचा लहान नऊ महिन्यांचा मुलगा, दूधवाला व एक फायनान्सवाला असे जवळपास सतराजण रात्रीच ताब्यात घेतले होते व त्यांची रवानगी नगर येथे शासकीय रुग्णालयात करण्यात आली होती. त्याचे स्राव रात्रीच तपासणीसाठी घेऊन तो पुण्यास रवानगी केली होती. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून यातील दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. उर्वरित सात जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसून त्याबाबत सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या