Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीगोंदा – तालुक्यातील सहा व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात, तीन दिवस अत्यावश्यक सेवा...

श्रीगोंदा – तालुक्यातील सहा व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात, तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लॉक डाऊन

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आतापर्यंत नगर जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे, आतापर्यंत जिल्ह्यातील काही तालुक्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .

श्रीगोंदा तालुक्यातील 6 व्यक्ती हे कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आले असल्यामुळे त्यांना आज सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणी साठी पाठविण्यात आले आहे.
अशी माहिती तहसिलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे.

- Advertisement -

कोरोना आता तालुक्याचा उंबरठ्यावर असल्याने खबरदारी चा उपाय म्हणून श्रीगोंदा तालुका प्रशासन हे दि 5/4/20 ते दि 7/4/20 असे 3 दिवस संचारबंदी संपूर्ण तालुक्यात जाहीर करत आहे. या कालावधीत तालुक्यात फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल आणि हॉस्पिटल खाजगी दवाखाने सुरू राहतील .इतर अत्यावश्यक सेवा किराणा, भाजीपाला, दूध, गॅस हे फक्त घरपोच सेवा देणे सुरू राहील. या कालावधीत कोणीही नागरिक हे अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाहीत याची सर्वानी दक्षता घ्यावी, अन्यथा त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई साठी गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या