Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

इंदोरीकर महाराजांना दिलासा

Share
‘ते’ किर्तन यू ट्यूबवरून गायब; सायबर सेलचा खुलासा, Latest News Kirtan Youtube Delete Cyber ​​Cell Statement Ahmednagar

वादग्रस्त किर्तनाचा तो व्हिडीओ यू ट्यूबवरून गायब ः सायबर सेल

अहमदनगर (प्रतिनिधी)-  ज्या वक्तव्यावरून गदारोळ झाला अन् प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) अडचणीत आले ते कीर्तनच यू ट्यूबवरून गायब झाले आहे. सायबर सेलच्या पोलिसांनी तसा खुलासा पीसीपीएनडीटी समितीचे सचिव तथा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे केला आहे. त्यामुळे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकरांना दिलासा मिळाला आहे.

सायबर सेलच्या या खुलाशानंतर आता या विषयावर पडदा पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सम-विषम तारखेचा किर्तनातील उल्लेखावरून इंदोरीकर महाराजांना जिल्हा आरोग्य विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. इंदोरीकर महाराजांनी त्या नोटीसला लेखी उत्तर देत ‘आपण असे बोललोच नाही’ अशी भूमिका घेतली होती.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन पोलिसांना दिले होते. सक्षम पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत इंदोरीकरांना दुसरी नोटीस पाठविण्यात आलेली नाही. त्यामुळे तूर्तास तरी इंदोरीकर महाराजांवर कोणतीही कारवाई होणार नाही असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पीसीपीएनडीटी समितीने आमच्याकडे इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाच्या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी पत्र दिले होते. ज्या व्हिडीओची तपासणी करण्याची मागणी समितीने केली होती. त्या व्हिडीओ लिंकचा शोध आम्ही घेतला. परंतु, यू ट्यूबवरून लिंक उडवली आहे. त्यामुळे व्हिडीओ यू ट्यूबवर उपलब्ध नसल्याचा अहवाल आम्ही पीसीपीएनडीटी समितीकडे पत्राद्वारे दिला आहे.
-अरुण परदेशी, पोलीस निरीक्षक सायबर सेल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!