Wednesday, April 24, 2024
Homeनगरकेडगावात टायरचे दुकान फोडले; साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

केडगावात टायरचे दुकान फोडले; साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथील टायरचे दुकान फोडून चोरट्याने दुचाकी, चारचाकीचे 515 टायर, 720 ट्यूब असा नऊ लाख, 47 हजार 300 रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. सोमवार (दि. 24) रात्री साडेआठ ते मंगळवार (दि. 25) सकाळी पावणेआठच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी दुकानाचे मालक प्रितेश संजय बाफना (वय- 25 रा. समर्थनगर, केडगाव) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रितेश बाफना यांचे केडगावात अरिहंत नावाचे दुचाकी, चारचाकीच्या टायरचे दुकान आहे. त्यांनी दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवलेला होता. सोमवारी (दि. 24) दिवसभर दुकान सुरू होते. बाफना यांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुकान बंद करून ते समर्थनगर येथील त्यांच्या घरी गेले.

- Advertisement -

साडेआठ नंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या पाठीमागील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. दुकानामधील दुचाकी व चारचाकी वाहनाचे 515 टायर व 720 ट्यूब असा नऊ लाख 47 हजार 300 रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. नेहमीप्रमाणे बाफना मंगळवारी सकाळी दुकानात आले असता दुकानातील मागील बाजूचे पत्रे उचकटून टायर, ट्यूबची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी या घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना दिली. घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी भेट देऊन पाहणी केली. बाफना यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी पुढील पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या