Friday, April 26, 2024
Homeनगरकर्जतसाठी कुकडीचे 19 दिवस आवर्तन : आ. रोहित पवार

कर्जतसाठी कुकडीचे 19 दिवस आवर्तन : आ. रोहित पवार

कर्जत (तालुका प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यासाठी कुकडीचे आवर्तन शुक्रवारी (दि. 13) सायंकाळपासून सुरू झाले आहे. पाच ते सहा दिवसांमध्ये पाणी करमाळा तालुक्यासाठी जाणार असून ते आठ ते नऊ दिवस राहणार आहे असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

कर्जत तालुक्यासाठी 18 ते 19 दिवस आवर्तन राहणार आहे. सीना व कुकडी धरण लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांची कोळवडी येथे काही दिवसांपूर्वी पाणी नियोजनाबाबत आवर्तनपूर्व बैठक झाली होती. पुढील आवर्तन हे कधी सोडले जावे? याबाबतही बैठकीत चर्चा झाली होती. कुकडी व सीना लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या

- Advertisement -

म्हणण्यानुसार मार्च अखेरीस पाणी सोडले तर शेती पिकांसाठी योग्य राहील अशी मागणी शेतकर्‍यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली होती. आमदार रोहित पवार यांनी पाण्याबाबत चर्चा केल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडुन परवानगी मिळाली होती. त्यानुसार कुकडीचे आवर्तन सुटले आहे.

18 तारखेला सीनाचे आवर्तन
कुकडीचे आवर्तन वेळेत सुटले असून आता सीना धरणाचे आवर्तनही येत्या 18 तारखेला सुरू होणार आहे. लाभधारक शेतकर्‍यांनी पाण्याचा योग्य वापर करावा. कोणत्याही पोटचार्‍यांची मोडतोड करू नये. कुकडीचे टेल-टू-हेड पाणी वाटप होणे गरजेचे आहे. सर्वांना समान पाणी वाटप होईल याकरता सहकार्य करावे.
– रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

- Advertisment -

ताज्या बातम्या