Wednesday, April 24, 2024
Homeनगरकर्जतमधील जयराज अ‍ॅग्रो इंन्डस्ट्रीज लुटण्याचा प्रयत्न

कर्जतमधील जयराज अ‍ॅग्रो इंन्डस्ट्रीज लुटण्याचा प्रयत्न

कर्जत (वार्ताहर)- कर्जत शहरातील जयराज अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज हे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेले दुकान काल सकाळी साडेआठ वाजता अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप उघडून लुटण्याचा प्रयत्न केला मात्र कूलूप उघडले नाही म्हणून अनर्थ टळला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे उघड झाला असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

या बाबत घडलेली घटना अशी की कर्जत शहरामध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या समोर अरंविद पाटील यांचे जयराज अ‍ॅग्रो इंन्डस्ट्रीज हे दुकान आहे. नेहमी प्रमाणे सकाळी 9 वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले होते. यावेळी कूलूप उघडताना एक शटरचे कुलूप उघडले नाही. शेवटी त्यांनी कटरच्या साह्याने कुलूप तोडले; मात्र त्यांना शंका आली म्हणून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरवात केली.

- Advertisement -

सुरुवातीला त्यांनी रात्रीचे सर्व फुटेज पाहिले मात्र काहीच दिसले नाही. नंतर सकाळचे फुटेज पाहिले असता साडेआठच्या सुमारास दुकानाचे शटरजवळ एक युवक कुलूप उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. याच वेळी दुकानच्या समोर त्याचे पाच ते सहा साथीदार उभे होते आणि ते कोणी येते का याची टेहाळणी करीत होते. त्यांच्या जवळ काही दुचाकीही होत्या.

श्री. पाटील यंानी दुकान उघडल्यानंतरही जवळपास अर्धा तास ही टोळी दुकानाच्या समोर थांबून काही हलचाल होते का हे पाहत थांबली होती; हे पण सी सीटीव्ही फुटेज मध्ये दिसले आणि जेव्हा पोलीस आले तेव्हा यानी काढता पाय घेतला.

बॉलने संकट टळले
जयराज अ‍ॅग्रो इंन्डस्ट्रीज या दुकानालगतच डायनॅमिक इंग्लिश स्कूल आहे. यावेळी शाळेच्या प्रांगणात काही मुले खेळत होती. हा चोरटा जेव्हा शटरचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करीत होता त्यावेळी तिथे त्या मुलांचा फुटबॉलचा बॉल आला हे पाहून त्या चोरटयाने तो बॉल त्या मुलाना पायाने मारून परत केला आणि तिथून निघून रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या आपल्या साथीदाराच्या सोबत उभा राहिला. या टोळीच्या म्होरक्याने काही सूचना दिल्यावर तो युवक परत आला व त्याने पुन्हा शटरचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलूप उघडले नाही व पुन्हा मुलांचा बॉल तिथे आल्यावर तो चोरटा तिथून निघून गेला दुकान उघडल्यावरही टोळी तिथेच थांबली होती.

भर दिवसा घटना घडल्याने खळबळ
कर्जत शहरामध्ये माघील अनेक दिवसा पासून चोरी किंवा दरोड्याच्या फारशा घटना घडलेल्या नाहीत. मात्र काल सकाळी साडेआठ वाजता भरवस्तीमध्ये समोर कॉलेज, शेजारी हायस्कूल व पेट्रोल पंप सर्वत्र मोठा वावर असताना आणि हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे तरीही ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

टोळीचा म्होरक्या अनेक पोलीस ठाण्यांचा ‘वॉण्टेड’
अरंविंद पाटील यांनी याची माहिती पेालिसांनी दिली. पेालीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी लगेच पोलीस कर्मचारी पाठवले. हे सर्व फुटेज इतर पोलीस स्टेशनला पाठविले असता या टोळीचा म्होरक्यावर अनेक ठिकाणी चोरीचे व दरोड्याचे गुन्हे दाखल असून तो इतर काही पोलीस स्टेशनमध्ये वॉण्टेड असल्याची माहिती समजली.

- Advertisment -

ताज्या बातम्या